Omicron Covid Variant | तिसर्‍या डोससाठी बुक करावा लागणार नाही ‘स्लॉट’, असा घेऊ शकता डोस; मुलांबाबत व्हॅक्सीन कंपनीने दिला ‘हा’ इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Covid Variant | कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या डोससाठी स्लॉट बुक (Third Shot Booking) करण्याची आता गरज नाही. 10 जानेवारी 2022 पासून तुम्ही वॉक-इन (थेट लस केंद्रावर पोहोचून) लस घेऊ शकता. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (Health And Family Welfare Ministry) सूत्रांनी ही माहिती दिली. (Omicron Covid Variant)

10 जानेवारीपासून सुरूवात

मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले की, CoWIN अ‍ॅपवर नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही.
ज्यांना COVID-19 लसीचे दोन डोस मिळाले आहेत ते थेट कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊ शकतात.
ते पुढे म्हणाले – ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा शनिवार, 8 जानेवारी 2022 रोजी सायंकाळपासून सुरू झाली आहे.
10 जानेवारीपासून साइटवर भेट घेऊन लसीकरण सुरू होईल.

तिसरा म्हणजे बूस्टर डोस (Booster Dose) सध्या तीन प्राधान्य गटांना द्यायचा आहे.
यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि गंभीर आजार असलेल्या 60 पेक्षा जास्त लोकसंख्येचा समावेश आहे.
दुसरी लस मिळाल्यानंतर 39 आठवड्यानंतर ते त्यांच्या तिसर्‍या बूस्टर डोससाठी पात्र असतील.
तिसरा डोस घेण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक (Online Appointment Booking) करू शकता किंवा कोणत्याही लसीकरण केंद्रावर थेट जाऊ शकता.

दरम्यान, हैदराबाद (Hyderabad) येथील व्हॅक्सीन निर्माता भारत बायोटेक Bharat Biotech (ज्यांची लस सध्या किशोरवयीन मुलांना दिली जात आहे) ने बुधवारी सांगितले की कोवॅक्सिन लस (Covaxin Vaccine) घेतल्यानंतर कोणत्याही पॅरासिटामॉल (Paracetamol) किंवा पेनकिलर (Painkiller) (वेदनाशामक) ची शिफारस केली जात नाही. (Omicron Covid Variant)

भारत बायोटेकने ट्विट केले की, आम्हाला माहिती मिळाली आहे की, लसीकरण केंद्रे मुलांसाठी कोवॅक्सिनसह तीन पॅरासिटामॉल 500 मिलीग्राम गोळ्यांची शिफारस करत आहेत. लस दिल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा वेदनाशामक औषधांची शिफारस केली जाऊ शकत नाही.

Web Title :-  Omicron Covid Variant | coronavirus crisis in india now no need to register slot for third shot as beneficiary can walk in from january 10 amid omicron threat

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | खराडीत 2 कुटुंबात झाली हाणामारी, 7 जणांवर गुन्हा ! भांडणामागचे कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण

 

Omicron Covid Variant | ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे किती दिवसांनी जाणवते? WHO ने सांगितले – ‘अशी करा आपली इम्युनिटी बूस्ट’

 

Police Inspector Transfer | पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 11 पोलीस निरीक्षक, 2 सहायक पोलिस निरीक्षक, 9 उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या