जम्मू-काश्मीरच्या काना-कोपऱ्यात तिरंगा फडकवण्याचा BJPचा ‘प्लॅन’, मागवले 50 हजार झेंडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वातंत्र्यदिनानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकावीण्यासाठी तब्बल पन्नास हजार तिरंगाध्वज मागविण्यात आले आहेत. यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रदेश कार्यकारिणीला सुती आणि खादीचे झेंडे दिल्लीतून मागविले असून ते कार्यकर्त्यांना आणि पंचायतीना देण्यात येणार आहेत. नव्याने केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता मिळाल्याने तेथील ग्रामपंचातींमध्ये १५ ऑगस्टनिमित्त चार हजाराहून जास्त झेंडे फडकविण्यासाठी देण्यात येणार आहे. याप्रंसगी सर्व गावांगावात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्रदिनानिमित्त तिरंगा फडकविण्याच्या पार्श्वभुमीवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. हा बंदोबस्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांच्या देखरेखीखाली त्यांचे पथक करणार आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, पंचवीस हजार सुती आणि २५ हजार खादीचे तिरंगे विशेषकरुन मागविण्यात आले आहेत. जम्मू, श्रीनगर आणि लेह मधील ग्रामपंचायतींना हे तिरंगे वाटण्यात येतील. स्वतंत्रदिनादिवशी होणाऱ्या कार्यक्रमाच्या सुचना तेथील पंचांना देण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच गुलामगिरीतून बाहेर पडल्यासारखे वाटत असून काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार असल्याने जश्न-ए-आजादीचा उत्साह प्रचंड आहे. तुर्तास पोलीस प्रशासनाची नजर बकरी ईदवर असल्याने ईद शांततापुर्ण होण्यावर प्रशासनाने लक्ष दिले आहे.

दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता
गुप्त सुत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १४ ऑगस्ट आणि भारतीय स्वातंत्रदिनी १५ ऑगस्ट रोजी सीमेपलीकडील दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबतीत डोवाल यांनी प्रदेशातील डीजीपी दिलबाग सिंह आणि मुख्य सचिव बी.वी.आर. सुब्रमण्यम यांच्याशी चर्चा करुन कडेकोट नजर ठेण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त