हिमाचलमधील हिमस्खलनात बेपत्ता असणाऱ्या 5 जवानापैकी एकाचा मृतदेह सापडला

शिमला (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्था – मागील महिन्यात हिमाचल प्रदेशातील किन्नूर जिल्ह्यात सिनो-भारत सीमेजवळ हिमस्खलनाची घटना घडली होती. या हिमस्खलनात एका जवानाचा मृतदेह मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यावेळी एकाचा मृतदेह आढळला होता. तर इतर ५ जवान अद्याप बेपत्ता असल्याचे समजत समजत होते. या घटनेनंतर बचावकार्य सुरु होते. दरम्यान आज पुन्हा पाच बेपत्ता लष्कराच्या कर्मचा-यांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. जवानाच्या मृत्यूमुळे दु:ख व्यक्त केेले जात आहे.

आयटीबीपी आणि आर्मीने शोध ऑपरेशन्स करत बेपत्ता 5 जवानांचा शोध सुरु ठेवला होता. या दरम्यान या पाच जवानांपैकी एकाचा मृतदेह समोर आला आहे. नामग्या, किन्नौर येथे 11 दिवसांपासून नामग्यामध्ये हिमवृष्टीत अडकलेल्या या जवानांना वाचवण्यासाठी आर्मीकडून शोध माेहीम सुरु होती. एका जवानाचा मृतदेह समोर आल्यानंतर आता इतर चार जवानांचा शोध अद्याप सुरुच आहे असे समजत आहे.

दरम्यान अकरा दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील किन्नूर जिल्ह्यात सिनो-भारत सीमेजवळ हिमस्खलनाची घटना घडली होती. या घटनेत जम्मू- काश्मीर रायफल्ससह इंडो- तिबेटियन सीमा पोलिस दलातील अनेक जवान अडकले होते असेही समोर आले होते. परंतु त्यांना वाचवण्यात मात्र यश आले होते. दरम्यान बर्फाखाली गेलेल्या सहा जवानांपैकी एकाचा मृतदेह आढळला होता आणि इतर पाच जवान बेपत्ता होते. त्यांचे बचावकार्य सुरु होते.