पंजाब सीमेवर चकमकीत पाकिस्तानी स्मगलर ठार; हेरॉईन, रायफल, काडतुसांचा साठा केला जप्त

अमृतसर : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या एकत्रित कारवाईत एक पाकिस्तानी तस्कर ठार झाला. पंजाबच्या अमृतसर येथील पाकिस्तानी सीमेवर झालेल्या या कारवाईत २२ पाकिटे हेरॉईन, २ ए के एम रायफल आणि ४ मॅगेझिन्स भरुन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई सीमा चौकी कक्कर फॉरवर्ड क्षेत्राजवळ बुधवारी पहाटे घडली. पाकिस्तानातून पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी केली जाते. ही तस्करी रोखण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. पंजाब पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाने आज पहाटे बीओपी कक्कर फॉरवर्ड भागात कारवाई केली. त्यात एका पाकिस्तानी तस्कराजवळ दोन भारतीय आंतरराष्ट्रीय सीमेवरुन भारतात ड्रग्ज घेऊन येत होते. यावेळी झालेल्या चकमकीत पाकिस्तानी तस्कर ठार झाला. दोघा भारतीय नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २२ पाकिटे हेरॉईन, २ ए के एम रायफल आणि ४ बंदुकांची मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत़.