Onion Export Duty | टोमॅटोनंतर महागणार नाही कांदा! भाव रोखण्यासाठी सरकारने केले ‘हे’ काम

नवी दिल्ली : Onion Price | टोमॅटोचा भाव विक्रमी पातळीवर गेल्यानंतर कांद्याचे दर वाढल्याने लोक हैराण झाले होते. मात्र, कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने मोठे पाऊल उचलले आहे (Onion Export Duty). देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी कांद्याचे भाव वाढण्याच्या भीतीने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले आहे. सरकारी (Modi Govt) आकडेवारीनुसार कांद्यावर प्रथमच निर्यात शुल्क लावण्यात आले आहे (Onion Export Duty).

३१ डिसेंबरपर्यंत निर्यात शुल्क लागू

विशेष म्हणजे दिल्लीत कांद्याची किरकोळ विक्री किंमत ३७ रुपये प्रति किलो झाली आहे. अर्थ मंत्रालयाने निर्यात शुल्क अधिसूचनेद्वारे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ४ ऑगस्ट दरम्यान देशातून ९.७५ लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. मूल्याच्या दृष्टीने, आयात करणारे तीन प्रमुख देश बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती आहेत. (Onion Export Duty)

निर्यातीमध्ये वेगाने वाढ

ग्राहक सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितले की, आगामी सणासुदीचा हंगाम लक्षात घेता देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडच्या काळात निर्यातीत झपाट्याने वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. याआधी कांद्याच्या निर्यातीला आळा घालण्यासाठी सरकारने नेहमीच किमान निर्यात मूल्याचा वापर केला होता. मात्र, यंदा प्रथमच निर्यात शुल्क लावण्यात आले आहे.

ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी राष्ट्रीय स्तरावर कांद्याची
सरासरी किरकोळ किंमत ३०.७२ रुपये प्रति किलो होती.
ही किंमत कमाल ६३ रुपये प्रति किलो आणि किमान १० रुपये प्रति किलो होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीत कांद्याचा भाव ३७ रुपये प्रति किलो होता.
चालू खरीप हंगामात कांद्याचे क्षेत्र कमी झाल्याच्या वृत्तामुळे कांद्याचे भाव वाढू लागले आहेत.
सरकारने यंदा तीन लाख टन कांद्याचा बफर स्टॉक ठेवला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr. Sunita More | डॉ. सुनीता मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर सरचिटणीस पदी नियुक्ती