लासलगाव जैन श्रमण संघाच्या संघपतीपदी कांदा निर्यातदार नीतीन जैन यांची निवड

लासलगाव – येथील जैन श्रमणसंघीय श्रावक संघ लासलगावच्या प्रभारी संघपती म्हणून जय आनंद ग्रुपचे सदस्य नितिन जेव्हरीलाल जैन यांची एकमताने निवड झाली.

संघपती रतनलाल राका यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर डॉ विजयकुमार बागरेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत येथील कांदा निर्यातदार नितीन जैन यांची लासलगाव जैन श्रमणसंघीय श्रावक संघ लासलगावच्या प्रभारी संघपती म्हणून निवड करण्यात आली.यावेळी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष सुरेश नाहाटा सेक्रेटरी विनोद तातेड फकिरचंद चोरडिया,जव्हरीलाल जांगडा,मनोज शिंगी,ओमप्रकाश राका,रमेश आबड, सुनील चंडालिया,तुषार बोरा,निखिल छाजेड आदी पदाधिकारी उपस्थित होते.त्यांच्या निवडी नंतर येथील सकल जैन समज व जय आनंद ग्रुप कडून तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.