Onkar Bhojane | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजनेला बड्या चित्रपटांची ऑफर

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. काही कारणांसाठी त्यांने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडून झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ या कार्यक्रमात एन्ट्री घेतली. यावेळी अनेकांनी त्याला ट्रोल देखील केले होते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ त्याने केवळ पैशांसाठी सोडल्याचे देखील अनेकांनी बोलले होते. मात्र ओंकारने (Onkar Bhojane) याकडे दुर्लक्ष करत आपले काम सुरू ठेवले होते.

ओंकारचा काही दिवसांपूर्वी ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला होता. तर आता ओंकार लवकरच मराठी मधील सुप्रसिद्ध मानले जाणारे दिग्दर्शक संजय जाधव यांच्याबरोबर काम करणार असल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात वायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये ओंकार (Onkar Bhojane) दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत दिसत आहे.
तर आता ओंकार लवकरच संजय जाधव यांच्या आगामी चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे.
या व्हिडिओमध्ये संजय जाधव, अभिनेता संजय नार्वेकर, ओंकार भोजने, हरीश दुधाणे इत्यादी कलाकार
दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की चित्रपटाचे रीडिंग चालू आहे.
मात्र अद्याप तरी हा चित्रपट नक्की कोणता? यामध्ये ओंकारची भूमिका काय? हे समोर आलेले नाही.
आता ओंकारचा मराठी चित्रपटांकडे कल वाढत चालला आहे.

Web Title :- Onkar Bhojane | maharashtrachi hasyajatra fem onkar bhojane in marathi movie directed by sanjay jadhav see details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paresh Rawal | ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाचा टीझर शूट संपन्न; चित्रपटात पाहायला मिळणार अनेक ट्विस्ट

Ahmadnagar Crime News | रात्री आडोशाला बसून दारू पिणे पडले महागात; काय आहे नेमके प्रकरण?