Online fraud | पुण्यात सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात कमालीची वाढ, गेल्या 6 महिन्यात 275 पुरुषांना लाखोंचा गंडा
पुणे न्युज (pune news) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – जर तुम्ही सोशल मिडिया (Social media) वापरत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. नोकरदार, व्यावसायिक तरुणाई सेक्सटॉर्शनची शिकार होत असल्याच्या धक्कादायक घटना वारंवार समोर येत आहेत. गेल्या 6 महिन्यांत पुण्यातील तब्बल 275 पुरुषांना अशाप्रकारे फसवून लाखो रुपयांचा गंडा (Online fraud) घातल्याचे समोर आले आहे. आरोपींनी संबंधित पुरुषांचे अश्लील फोटो अन् व्हिडीओ (Obscene photo and video) मागवून त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणाचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचले असून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींशी संवाद साधू नये. तसेच आपले वैयक्तिक फोटो अज्ञातांना पाठवू नये, असा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे. अशाप्रकारे ऑनलाइन फसवणूकीचे (Online fraud) प्रमाण वाढले आहे. online fraud | blackmail by sending facebook request fake young woman profile 275 men in pune ransom for lakhs of rupee
पुण्यात मुंढवा (Mundhwa) परिसरात राहणाऱ्या एका 32 वर्षीय व्यावसायिकाला अज्ञात आरोपींनी 18 हजाराला गंडा घातला आहे. आरोपींनी न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ऑनलाइन खंडणी वसूल केली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत (Cyber Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपी बनावट फेसबुक अकाऊंट (Facebook account) काढून त्यावर मादक महिलेचा खोटा प्रोफाइल तयार करतात. त्यानंतर विविध शहरातील लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. फोटो पाहून अनेकजण आरोपीच्या जाळ्यात अडकतात. यानंतर आरोपी महिला बनून तरुणांशी चॅटींग करतात. त्यानंतर मोबाइल नंबर मागतात.
–
त्याचबरोबर आरोपी मॉड्युलेटर सॉफ्टवेअरचा वापर करत,
पुरुषांचा आवाज महिलेच्या आवाजात रुपांतरित करून समोरच्या व्यक्तीला ऐकवतात.
आरोपीने विश्वास संपादन केल्यानंतर रात्री -अपरात्री अश्लील चॅटींग करत न्यूड फोटो किंवा व्हिडीओची मागणी करतात.
यानंतर न्यूड व्हिडीओ हाती लागल्यानंतर आरोपी पैशाची मागणी करण्यास सुरुवात करतात.
तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देतात.
त्यामुळे बदनामीच्या भीतीने अनेकजण त्याची मागणी पूर्ण करतात.
Web Title :- online fraud | blackmail by sending facebook request fake young woman profile 275 men in pune ransom for lakhs of rupee
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल
Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज
Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी