एकुलत्या एक मुलाचा मारेकर्‍याकडून गळा आवळून खून

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – भिवंडी तालुक्यातील करंजोटी या गावातील आकाश नारायण शेलार या तरुणाची गळा आवळून तसेच वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी रात्री घडली. त्याचा मृतदेह गावाबाहेरील शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. नारायण शेलार यांचा तो एकुलता एक मुलगा होता.

तो खडवली येथील महाविद्यालयात १४वी मध्ये शिकत होता. तसेच तो वडिलांबरोबर तो जिंदाल कंपनी मध्ये तो काम देखील करत होता. या घटनेची माहिती मिळताच पडघा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.

पोलिसांनी हत्ये प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु हि हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास पोलीस करत आहे. आकाश शेलार यांचे वडील नारायण शेलार आपल्या मुलाची हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक पी. जे .चौधरी करत आहेत.