केवळ पहिल्या पत्नीलाच पतीच्या पैशावर दावा सादर करण्याचा अधिकार : मुंबई हायकोर्ट

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले की, कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या दोन पत्नी असतील आणि दोघी त्याच्या पैशावर दावा करत असतील तर केवळ पहिल्या पत्नीचा यावर अधिकार आहे, मात्र दोन्ही विवाहातून झालेल्या मुलांना पैसा मिळेल. न्यायमूर्ती एस. जे. कथावाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या पीठाने ही तोंडी टिप्पणी केली. राज्य सरकारने सांगितले की, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाने अशाच प्रकारचा निर्णय दिला होता, ज्यानंतर पीठाने ही टिप्पणी केली.

न्यायमूर्ती कथावाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ महाराष्ट्र रेल्वे पोलीस दलाचे सहायक उपनिरीक्षक सुरेश हाटनकर यांच्या दुसर्‍या पत्नीकडून दाखल याचिकेवर सुनावणी करत होते. हाटनकर यांचा 30 मेरोजी कोविड-19 ने मृत्यू झाला.

राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार ड्यूटीवर असताना कोविड-19 ने मृत्यू होणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना 65 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, ज्यानंतर हाटनकर यांची पत्नी असल्याचा दावा करणार्‍या दोन महिलांनी भरपाईच्या रक्कमेसाठी अधिकार दर्शवला होता.

नंतर हाटनकर यांच्या दुसर्‍या पत्नीची मुलगी श्रद्धाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मागणी केली की, भरपाईच्या रक्कमेतील अनुकंपातील भागीदारी मिळाली पाहिजे, कारण ती आणि तिची आई उपासमार आणि बेघर होण्यापासून वाचतील.

राज्य सरकारच्या वकिल ज्योती चव्हाण यांनी मंगळवारी खंडपीठाला सांगितले की, जोपर्यंत उच्च न्यायालय भरपाईच्या रक्कमेचे हक्कदार कोण आहेत हे ठरवत नाहीत तोपर्यंत राज्य सरकार भरपाईची रक्कम न्यायालयात जमा करेल. चव्हाण यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाबाबत सुद्धा न्यायालयाला अवगत केले.

यानंतर न्यायालयाने म्हटले की, कायदा सांगतो की, दुसर्‍या पत्नीला काहीही मिळू शकत नाही. परंतु, दूसर्‍या पत्नीपासून झालेली मुलगी आणि पहिली पत्नी तसेच पहिल्या विवाहितून झालेली मुलगी हे रक्कमेचे हक्कदार आहेत. हाटनकर यांची पहिली पत्नी शुभदा आणि दाम्पत्याची मुलगी सुरभी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणीसाठी उपस्थित होते, त्यांनी दावा केला की, त्यांना माहित नव्हते की, हटनकर यांचे दुसरे कुटुंबसुद्धा आहे.

मात्र, श्रद्धाचे वकिल प्रेरक शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले की, सुरभी आणि शुभदाला हाटनकर यांच्या दुसर्‍या विवाहाबाबत माहिती आहे आणि अगोदर त्यांनी सुरभीशी फेसबुकवर संपर्क केला आहे. न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी गुरूवारी ठेवली आहे.