बँकेपेक्षा पोस्टात जलद होतील दुप्पट पैसे

नवी दिल्ली : 

अधिक नफा मिळवण्यासाठी लोक पैसे गुंतवणुकीसाठी  पोस्टापेक्षा  बँक व्यवहाराला अधिक प्राधान्य देतात. परंतु तुम्ही आता अधिक नफा देणारी गुंतवणूक पोस्टातही करू शकता. विशेष म्हणजे पोस्टात जमा केलेले पैसे बँकेपेक्षा दुप्पट नफा मिळवून देतात.

बँकेच्या फिक्स्ड डिपॉजिटसारखीच पोस्ट ऑफिसचीही “टाइम डिपॉझिट” ही स्कीम आहे. ज्यात तुम्ही कमीत कमी २०० रुपयांपासून खातं उघडू शकता. तसेच जास्त रक्कम जमा केल्यास कोणतीही मर्यादा नाहीये. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार पाहिजे तेवढी खाती उघडू शकतो. तुमच्याकडे जास्त पैसे असल्यास तुम्ही ते वेगवेगळ्या खात्यांमध्ये  ठेवू शकता. या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वर्षाला ६. ६ टक्के, दोन वर्षाला ६. ७  टक्के, तीन वर्षाला ६.९ टक्के,५ वर्षांसाठी ७.४ टक्क्यांनी व्याज मिळतं.तसेच पोस्टात ठेवीच्या स्वरूपात गुंतवलेले पैसे तुम्ही ठरावीक मर्यादेच्या आधीही काढू शकता. परंतु त्यासाठी तुम्ही पैसे गुंतवल्यानंतर ६  महिने पूर्ण झालेले असले पाहिजेत.

जर तुम्ही १  वर्ष, २ वर्षं, ३ वर्षं, आणि ५ वर्षांसाठी पोस्टात खातं उघडलं असेल, परंतु तुम्ही ६ महिन्यांनंतर वर्षाच्या आत पैसे काढल्यात तुम्हाला तुमचे पैशांवर बेसिक व्याजानुसार परतावा दिला जातो. तुम्ही ठेवीच्या मर्यादेच्या आधीच पैसे काढल्यास पोस्ट ऑफिस तुम्हाला तुमच्या सर्व पैशांसह ठरावीक व्याजाच्या २ टक्के कमी व्याजच्या स्वरूपात परतावा देते.
[amazon_link asins=’B019XSHJWG,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’81ecb121-ab86-11e8-98a1-ed371192ef4c’]

कुठे उघडू शकता खातं ?

केंद्र सरकारच्या नियमानुसार, तुम्ही एचडीएफसी, एक्सिस आणि आयसीआयसीआय सारख्या खासगी बँकांमध्येही पोस्टाची खाती उघडू शकता.
पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पोस्टात जाण्याची गरज नाही.

पोस्टाच्या योजनांचे फायदे

पोस्टात ठराविक रक्कम ठेवावीच अशी कोणतीही सक्ती नाही, तुम्ही २०० रुपयांपासून पोस्टाचं खातं उघडू शकता.
टाइम डिपॉजिट योजनेवर व्याज ७. ४ टक्के आहे. जो बँकेच्या एफडीपेक्षा जास्त आहे.  ५ वर्षांच्या योजनेत पैसे गुंतवल्यास पैशांवर कोणताही कर आकारला जाणार नाही.
तुम्ही पोस्टात खातं उघडून कर्जही मिळवू शकता.
तुम्ही ठरावीक काळासाठी ठेवलेल्या ठेवी काढायचा असल्यास तुम्ही ते पैसे तुमच्या बचत खात्यामध्येही वळते करू शकता.
पोस्टाची योजना ही सरकारी असल्यानं कोणतीही जोखीम नाही .

तसेच तुमच्या पैशाचीही पोस्ट ऑफिस हमी देतो. तसेच तुम्ही पोस्टात ठेवी ठेवल्यास तुम्हाला बँकेच्या तुलनेत जास्त व्याज मिळतं. तुम्ही एफडीच्या स्वरूपात पैसे ठेवल्यास तुम्हाला विमा सुरक्षा आणि हमी तर मिळते. त्याशिवाय चांगला परतावाही मिळतो. जर बँकेला काही तोटा झाल्यास योजनेंतर्गत पैसे जमा केलेल्या ग्राहकाला फक्त १  लाख रुपये परत मिळतात. परंतु पोस्टात असं होतं नाही. पोस्ट ऑफिस तुम्हाला तुमच्या सर्व पैशांची हमी देते.