ओप्पोचा फोल्डेड मोबाईल लवकरच बाजारात  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाईल फोनमध्ये रोज नवनवीन क्रांती होताना दिसत आहे. आता मोबाईल बनवणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक ओप्पो कंपनी नवा मोबाईल बाजारात आणणार आहे. ह्या मोबाईलचे वैशिष्ट्य म्हणजे हा मोबाईल फोल्ड करता येणारा आहे. पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये ओप्पोकडून हा मोबाइल लॉन्च केला जाणार असल्याचे समजते आहे.

धुमधड्याक्यात होणार लॉन्च’

ओप्पो स्मार्टफोन कंपनी फोल्डेबल मोबाइलवर काम करत असल्याचं वृत्त यापूर्वीच माध्यमांमध्ये आलं होतं. मात्र, हा मोबाइल कधी लॉन्च होणार, याबाबत अस्पष्टता होती. मात्र, आता त्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. ओप्पोकडून लवकरच बाजारात फोल्डेबल मोबाइल आणला जाईल, अशी माहिती ओप्पोचे प्रॉडक्ट मेनेजर चुक वेंग यांनी दिल्याचं एका डच बॉगनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये हा मोबाइल लॉन्च केला जाईल असे  एका  ब्लॉगमधून जाहीर करण्यात आले आहे. पण, हा मोबाइल नेमका आहे कसा? त्याची आणखी वैशिष्ट्ये काय आहेत, याविषयी अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही. ५ जी सुविधा असलेला ओप्पोचा स्मार्टफोन आगामी सहा महिन्यात युरोपीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.