44MP ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च झाला Oppo Reno 3 Pro

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने भारतात नवीन स्मार्टफोन Oppo Reno 3 Pro लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 44 मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यासह, अल्ट्रा नाईट सेल्फी मोड, एआय नॉइस कॅन्सलेशन अशी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. कंपनीने दावा केला आहे की, हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 44 मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पोने या इव्हेंटमध्ये स्मार्टफोनसह ओप्पो एन्को डब्ल्यू 31 वायरलेस इयरबड्सदेखील लॉन्च केले आहेत. याचे दोन व्हेरिएंट आहेत. एका व्हेरिएंटची किंमत 4499 रुपये आहे, तर दुसर्‍या व्हेरिएंटची किंमत 7,990 रुपये आहे. ओप्पो रेनो 3 प्रो 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,990 रुपये आहे. तर 8 जीबी रॅमसह 256 जीबी वेरियंटची किंमत 32,990 रुपये आहे. 6 मार्चपासून या स्मार्टफोनची विक्री सुरू होईल.

ओप्पोने म्युच्युअल फंडसुद्धा सुरू केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, या प्रकारची सेवा देणारी ही पहिली मोबाइल कंपनी आहे. या अंतर्गत तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता, एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकता. वापरकर्ते गुगल अॅप स्टोअर वरून हे अॅप डाउनलोड करू शकतात. कंपनीने या सेवेचे नाव Oppo Kash असे ठेवले आहे. सोबतच कंपनीने असाही दावा केला आहे की, हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 44 मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ओप्पो रेनो 3 प्रो तीन रंगांच्या अरोरा ब्लू, मिडनाईट ब्लॅक आणि स्काय व्हाईटसह लॉन्च केले गेले आहे.

ओप्पोने त्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये फॅशन फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनाही बोलावले असून त्यांनी या स्मार्टफोनच्या कॅमेर्‍याविषयी सांगितले. दरम्यान, ओप्पो रेनो 3 प्रो चीनमध्ये यापूर्वीच लाँच झाला होता, परंतु तेथे फक्त त्याचे 5 जी व्हेरिएंट लाँच केले गेले. भारतात कंपनीने काही बदलांसह हे बाजारात आणले आहे. कारण ओप्पो रेनो 3 प्रो 5 जी च्या चिनी व्हर्जनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो रेनो 3 प्रो मध्ये चार रियर कॅमेरे आहेत. यात 13 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आहे. 2 मेगापिक्सलचा मोनो लेन्स, तर 8 मेगापिक्सलचा वाइड एंगल कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच ओप्पो रेनो 3 प्रो मध्ये मीडियाटेक हेलियो पी 95 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनसह, आपल्याला 4025mAh बॅटरी देण्यात आली असून 30W VOOC वेगवान चार्जिंग सपोर्टदेखील देण्यात आला आहे. ओप्पो रेनो 3 प्रो मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. यात यूएसबी टाइप सी कनेक्टर आहे.