लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; बिटकाईनमध्ये गुुंतवणुकीसाठी 11 लाखांची फसवणूक

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार करण्याबरोबर बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्यासाठी तसेच सिंगापूर येथे नोकरीसाठी ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी रोनित डी कपूर ऊर्फ संदीप दादाराव वायभिसे (वय ३४, रा. वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका ३१ वर्षाच्या महिलेने हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे स्टेशन, विमाननगर, लोहगाव येथे २९ नोव्हेंबर २०१९ ते २३ डिसेंबर २०२० दरम्यान घडला.

रोनित कपूर याने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्यासाठी तसेच सिंगापूर येथे नोकरीसाठी त्याने तिच्याकडून लाखो रुपये घेतले. नर्सिंग कोर्सकरीता पैसे घेतले. तिचे क्रेडिट व डेबिट कार्ड वापरुन अनेक वस्तूंची खरेदी केली. अशा प्रकारे त्याने तिचे जवळपास ११ लाख रुपये वापरले. हे पैसे परत देण्याची मागणी तिने केल्यावर पैसे परत देणार नाही, अशी धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आपले पैसे परत करणार नाही आणि लग्नही करणार नाही, हे लक्षात आल्यावर या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली.