खुशखबर ! मोदी सरकार ‘अशा’ प्रकारची शेती करणार्‍यांना देणार 50 हजार रूपये, पडीक पडणार नाही जमीन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नापीक जमीनीमुळे निम्मा देश परेशान असून भारतातील जवळपास 30 टक्के जमीन हि नापीक झाली आहे. मात्र या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी भारताने जागतिक स्तरावर पुढाकार घेतला आहे. यामध्ये ग्रेटर नोयडामध्ये सुरु असलेल्या जागतिक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना म्हटले कि, भारतीय संस्कृतीमध्ये पृथ्वीला पवित्र मानले जाते. तिला आईचा दर्जा दिला जातो. त्यामुळे शेतकरी म्हणून आपल्याला कुणालाही पृथ्वीला आजारी करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे यापुढे आपण जैविक शेती करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे जैविक शेतीच्या बळावरच आपण नापीक जमिनीला उत्तम बनवू शकतो.

PKVY: आर्गेनिक फार्मिंग के लिए मोदी सरकार दे रही 50 हजार रुपये, बंजर होने से बचेगी धरती!

यावेळी मोदींनी घोषणा केली कि, 2030 पर्यंत भारतातील 2.6 कोटी हेक्टर नापीक जमिनीला शेतीयोग्य बनवले जाणार आहे. सुरुवातीला हे लक्ष्य 2.1 कोटी हेक्टर होते. मात्र आता सरकारने आपले ध्येय वाढवले असून यामध्ये तुम्हाला पैसे देखील मिळणार आहेत.

किसान, farmers, खेती-किसानी, Farming, pm narendra modi, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रोजगार, employment, narendra modi, नरेंद्र मोदी, barren land, बंजर जमीन, wasteland, Agricultural Situation in India, भारत में कृषि की स्थिति, सेंटर फॉर साइंस एंड एन्वायरमेंट, CSE, kisan, Ministry of Agriculture, कृषि मंत्रालय, ministry of environment, कॉप-14, Conference of Parties, desertification, बंजर जमीन

प्रति हेक्टर 50 हजार रुपये मदत मिळणार –

परंपरागत कृषि विकास योजना (PKVY) या योजनेंतर्गत तुम्हाला जैविक शेती करण्यासाठी 50 हजार रुपये हेक्टर मागे मिळणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना औषधे, कीटकनाशके घेण्यासाठी या रकमेचा उपयोग होणार आहे. या प्रकारच्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा अजिबात वापर केला जात नाही. कीटकनाशके देखील मोठ्या प्रमाणात वापरली जात नाहीत.

ऑरगॅनिक शेतीची वाढती मागणी –

इंटरनॅशनल कंपीटेंस सेंटर फॉर ऑरगॅनिक अ‍ॅग्रीकल्चर संस्थेच्या मते 2020 पर्यंत भारतात ऑरगॅनिक शेतीचा बाजार हा 1.50 बिलियन अमेरिकी डॉलर पर्यंत जाणार आहे. केंद्रीय आयात निर्यात नियंत्रण बोर्डाच्या माहितीनुसार, भारतात 2017-18 मध्ये जवळपास 1.70 मिलियन मेट्रिक टन जैविक खाद्य निर्मिती करण्यात आली आहे. अमेरीका, युरोपीय संघ, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इजरायल, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड यांसारखे देश भारतातून जैविक खाद्यपदार्थांचे प्रमुख आयातदार आहेत.

किसान, farmers, खेती-किसानी, Farming, pm narendra modi, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रोजगार, employment, narendra modi, नरेंद्र मोदी, barren land, बंजर जमीन, wasteland, Agricultural Situation in India, भारत में कृषि की स्थिति, सेंटर फॉर साइंस एंड एन्वायरमेंट, CSE, kisan, Ministry of Agriculture, कृषि मंत्रालय, ministry of environment, कॉप-14, Conference of Parties, desertification, बंजर जमीन

असे मिळवा ऑरगॅनिक शेतीचे प्रमाणपत्र –

ऑरगॅनिक शेतीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक प्रोसेस आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करावा लागतो तसेच शुल्क देखील भरावे लागते. त्याचबरोबर तुमच्या मातीचे नमुने, सिंचन पद्धत तसेच कापणी, पॅकिंग आणि सर्व पद्धत तुम्ही ऑरगॅनिक पद्धतीने करायला हवी. यानंतर तुमच्या मालाची पाहणी केल्यानंतर तुम्हाला ऑरगॅनिक शेतीचे प्रमाणपत्र मिळते.

आरोग्यविषयक वृत्त –