2 वेळा ऑस्कर विजेता राहिलेल्या ओलिविया डी हैविलैंड यांचं 104 व्या वर्षी निधन

पॅरिस : वृत्त संस्था – हॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि दोन वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकणार्‍या ओलिविया डी हेविलँड यांचे निधन झाले आहे. त्या 104 वर्षांच्या होत्या. हेविलँड यांच्या प्रवक्त्या लीजा गोल्बर्ग यांनी सांगितले की, हेविलँड यांनी रविवारी सायंकाळी पॅरिस येथील आपल्या निवास्थानी अखेरचा श्वास घेतला.

हेविलँड ‘गॉन विथ द विंड‘मध्ये दिसल्या होत्या. हा चित्रपट 1939 मध्ये रिलीज झाला होता. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या चित्रपटात त्या मेलानी हॅमिल्टनच्या भूमिकेत दिसल्या. जी स्करलेट ओहाराची बहिण आणि त्यांची सर्वात चांगली मैत्रिण होती. हेविलँड या चित्रपटातील शेवटच्या हयात असलेल्या कलाकार हात्या. आपल्या सहा दशकाच्या कारकिर्दीत हेविलँड यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्या स्टूडियो युगातील शेवटच्या कलाकारांपैकी एक होत्या.

हेविलँड यांचा जन्म 1 जुलै 1916 मध्ये टोकियोमध्ये ब्रिटिश पेटेंट अ‍ॅटर्नी यांच्या येथे झाला. जेव्हा त्या तीन वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यांची आई त्यांना आणि त्यांची बहिण जोन हिला घेऊन कॅलिफोर्नियाला घेऊन आली होती.

ओलिविया यांना 1946 चा चित्रपट ’टू ईच हिज ओन’ आणि 1949 च्या ’द हेरिस’मधील आपल्या एका भूमिकेसाठी सुद्धा ऑस्कर मिळाले होते. हेविलँड यांनी दोन विवाह केले. प्रथम लेखक मार्कस गुडरिच यांच्याशी आणि नंतर पत्रकार पेरे गलांटे यांच्याशी त्यांनी विवाह केला होता.

त्यांना पाचवेळा अकादमी पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते, ज्यापैकी ‘टू ईच हर ओन‘ (1946) आणि ‘द हेरिस‘ (1949) साठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचे ऑस्कर देण्यात आले.