Corona World Update : युरोपीय देशांमध्ये वाढतोय ‘कोरोना’च्या दुसर्‍या लाटेचा कहर

पॅरिस : वृत्तसंस्था – कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत सापडलेल्या अनेक युरोपीय देशांमध्ये या घातक व्हायरसचा कहर वाढत चालला आहे. फ्रान्समध्ये मागील 24 तासात 23 हजार 292 नव्या पॉझिटिव्ह केस आढळल्याने कोरोना पीडितांचा आकडा 30 लाखांच्या पुढे गेला. तर स्पेनमध्ये सुद्धा महामारीचा कहर जारी आहे. येथे 42 हजारपेक्षा जास्त नवीन संक्रमित आढळले आहेत. एक दिवस अगोदर विक्रमी 44 हजारपेक्षा जास्त प्रकरणे सापडली होती. युरोपमध्ये ब्रिटन कोरोना महामारीने सर्वात जास्त प्रभावित आहे.

फ्रान्स आणि स्पेनमध्ये स्थिती गंभीर
फ्रान्स सरकारच्या वेबसाइटनुसार, देशात मागील 24 तासात 649 पीडितांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची एकुण संख्या 72 हजार 647 झाली आहे. देशभरातील हॉस्पीटलमध्ये यावेळी 25 हजार 872 रूग्ण दाखल आहेत. तर, स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, मागील 24 तासांमध्ये 400 रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकुण आकडा 55 हजार 441 झाला. देशात संक्रमित लोकांची संख्या सुमारे 25 लाख झाली आहे. स्पेनमध्ये संसर्गाच्या प्रतिबंधासाठी अनेक कठोर पावले उचलण्यात आली आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर युरोपमध्ये संसर्ग वाढला आहे.

– हॉगकाँग : चीन नियंत्रित या क्षेत्रात कोरोनावर अंकुश मिळवण्यासाठी काही भागात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. येथे एकुण 9,929 प्रकरणे सापडली आहेत.

– रशिया : देशभरात 20 हजार 921 नवीन प्रकरणे सापडल्यानंतर संक्रमितांची संख्या 36 लाख 98 हजार झाली आहे. एकुण 68 हजार 971 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.