Olympic : 20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिकमध्ये दिसणार भारतीय ‘घोडेस्वार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : यंदा टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये जिथे संपूर्ण देशाचे लक्ष नेमबाजी, बॉक्सिंग, अ‍ॅथलेटिक्स, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिसवर आहे. तसेच यावर्षी ऑलिम्पिकमध्ये देशातील प्रत्येक व्यक्तीचे लक्ष घोडेस्वारीकडेही असणार आहे. 20 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारत ऑलिम्पिक घोडेस्वारी स्पर्धेत आपले आव्हान सादर करणार आहे. ऑलिम्पिकमध्ये स्टार घोडेस्वार फवाद मिर्जा याच्याकडून संपूर्ण देशाला मोठ्या आशा आहेत.

ऑलिम्पिकमध्ये गेल्या दशकांपासून घोडेस्वारीत भारताकडून कोणताही स्पर्धक उतरत नव्हता, मात्र फवादने ती कमी पूर्ण करत ऑलिम्पिकमध्ये कोटा साध्य केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फवादने युरोपियन स्तर गाठल्यानंतर दक्षिण पूर्व आशियामधील ओसियाना ग्रुप जी वैयक्तिक स्पर्धेतील तो सर्वोच्च क्रमांकाचा घोडेस्वार झाला होता. 2018 एशियन गेम्समध्ये फौद मिर्झाने 36 वर्षांनंतर भारतातील इक्वेस्ट्रियनमध्ये पदक मिळवून दिले होते. गेल्या 36 वर्षात वैयक्तिक पदक मिळविणारा तो पहिला भारतीय ठरला. त्यांनतर आता 20 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये वयैक्तीक कोटा मिळविला. यासह, फवाद ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा तिसरा भारतीय असेल. त्याआधी भारताने दोनदा ऑलिम्पिक इक्वेस्ट्रियन स्पर्धेत भाग घेतला होता.1996 मध्ये विंग कमांडर आयजे लांबा यांनी अटलांटा ऑलिम्पिकमध्ये आणि 2000 मध्ये सिडनी ऑलिम्पिकमधील इम्तियाज अनीसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे नेत आहे फवाद
फवाद आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे नेत आहे. त्याचे पूर्वजही या खेळाशी संबंधित होते. घोडेस्वारी करणारा तो त्यांच्या कुटुंबातील सातवी पिढी आहे. इव्हेंटिंग इंडिविज्युअल इवेंटमध्ये फवादने ऑलिम्पिक तिकिट मिळविण्यात यश संपादन केले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने पोलंडच्या स्ट्रेजगोम येथे आयोजित ऑलिम्पिक क्वॉलीफाय स्पर्धेत प्रथम स्थान मिळवले. 27 वर्षांच्या फवादने सहा क्वालिफाईंग स्पर्धांमधून एकूण 64 गुण मिळवले. त्याने पहिला घोडा फर्नहिल फेसटाइमकडून 34 आणि दुसर्‍या घोडा टचिंगवूडकडून 30 गुण मिळवले. फवादला चीन आणि थायलंडमधील संघांच्या क्वालिफाईंगसाठी प्रतीक्षा करावी लागली. दोन्ही संघांनी मागच्या इटलीमध्ये क्वालिफाईंग केले. हे दोन्ही देश संघ म्हणून क्वालिफाय नसते तर त्यांनी वैयक्तिक पदे घेतली असती आणि भारताला घोडेस्वारीचा कोटा मिळाला नसता.