शांतता भंग करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ : नरेंद्र मोदी

अहमदाबाद: वृत्तसंस्था
दहशतवादाच्या नावाखाली अतिरेक्यांनी छुपे युद्ध सुरु केले होते. त्यामुळेच सर्जिकल स्ट्राइक करावा लागला असे सांगताना जे लोक आमच्या देशातील शांतता भंग करण्याचा आणि देशाच्या प्रगतीत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ मधून पकिस्तानला दिला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d698e80-c48f-11e8-a64a-eb2df8dfba57′]

‘पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त २९ सप्टेंबर रोजी ‘पराक्रम दिवस’ साजरा केल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याला सलामही केला. आता गप्प बसायचं नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे. आमच्या देशाची शांतता भंग करण्याचा कुणी प्रयत्न केला तर आमचे सैनिक त्यांना जशास तसे उत्तर देतील. भारताने नेहमीच शांततेचा मार्ग पत्करला आहे. मात्र त्यासाठी देशाच्या अखंडतेला धक्का पोहचू दिला जाणार नाही, असं मोदींनी ठणकावलं.

कुणाल कुमारांचे ‘गोंधळ’ निसरताना भाजपची दमछाक 

‘मन की बात’ मधील ठळक मुद्दे
मोदींनी नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांचा उल्लेख करताना त्यांच्या साहसाचं कौतुकही केलं.
महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीनिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
गांधी जयंती निमित्त जगभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

एक्सप्रेसवे वरील प्रवासाची बचत करणाऱ्या विस्तारीकरणाचे काम होणार सुरु

लालबहादूर शास्त्री यांची जयंतीही साजरी करणार 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊनच १२ ऑक्टोबर १९९३ रोजी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली.
यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं स्मरण केलं. मानवाधिकार आपल्यासाठी नवीन नाही, असं वाजपेयी म्हणाले होते, असंही त्यांनी सांगितलं.

स्त्रिया सशक्त झाल्या, आता सशस्त्रही होत आहेत. हवाई दलाने स्त्री-पुरुष समानतेचं उदाहरण दाखवून दिलं आहे.
३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या ‘रन फॉर युनिटी’त सहभागी व्हा.

जाहिरात