महापालिका पाणी पुरवठा विभागाची 491 प्रकरणे निकाली

3 कोटी 73 लाख रुपये तडजोडीतून उत्पन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महापालिका भवन येथे रविवारी झालेल्या महालोक अदालत मध्ये पाणी पुरवठा विभागाची 491 प्रकरण निकाली काढण्यात आली. या तडजोडीतून पालिकेला तीन कोटी 73 लाख 89 हजार रुपये उत्पन्न मिळाले, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

पुणे महापालिकेची पाणी पट्टी ची थकबाकी सुमारे 500 कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये दुबार, मीटर नादुरुस्ती, चुकीच्या नोंदी, वापर नसताना येणारे बिल अशा विविध तक्रारी आहेत. यापैकी अनेक प्रकरण न्यायालयात गेली आहेत. मागील काही वर्षांपासून न्यायालयाने यावर ताडजोडीतुन मार्ग काढण्यासाठी महालोक अदालतींचे आयोजन केले आहे.

आज न्यायालयाने महापालिका भवन येथे आयोजित केलेल्या महालोक अदलती मध्ये पालिकेने दोन हजार 470 थकबाकीदारांना नोटिसेस पाठविल्या होत्या. त्यापैकी 491 केसेस मध्ये तडजोड झाली. तीन न्यायाधीशांच्या पॅनल समोर महापालिकेचे अधिकारी आणि थकबाकीदार यांच्यामध्ये तडजोडीने समेट घडविण्यात आला . आयएलएस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले अशी माहिती महापालिकेच्या विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांनी दिली.