‘आत्मनिर्भर’ बनला 2020 चा ऑक्सफोर्ड हिंदी शब्द, PM मोदींनी गेल्या वर्षी दिला होता ‘आत्मनिर्भर भारतचा ‘ नारा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये कोरोना साथीच्या दरम्यान ‘आत्मनिर्भर भारत’ चा नारा दिला. आत्मनिर्भर म्हणजे स्वतःवर अवलंबून असणे. पंतप्रधानांची ही संकल्पना देशवासी देखील पूर्ण करत आहे. हा शब्द तेव्हापासून चर्चेत आहे. या दरम्यान, ऑक्सफोर्डने ‘आत्मनिर्भर’ शब्दाला 2020 चा हिंदी शब्द म्हणून निवडले आहे. हा शब्द निवडण्याचे कारण भारतीय लोक आहेत, ज्यांनी कोरोना साथीच्या वेळी लढा दिला आहे. ऑक्सफोर्डच्या हिंदी शब्दकोशात आता तो जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्सफोर्ड भाषेच्या पॅनेलने हा निर्णय घेतला आहे. या पॅनेलमध्ये कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सवेल यांचा समावेश होता.

ऑक्सफोर्ड दरवर्षी अश्या शब्दाची घोषणा करते, ज्याला गेल्या वर्षी खूप महत्त्व प्राप्त झाले. तसेच या शब्दाला सांस्कृतिक महत्त्वही असले पाहिजे. ऑक्सफोर्ड लँग्वेजने आपल्या निवेदनात म्हटले की, साथीच्या काळात पंतप्रधान मोदींनी कोरोना पॅकेजची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींनी कोरोना दम्यान दिलेल्या भाषणात आत्मनिर्भर या शब्दाचा वापर झाल्यानंतर हा शब्द बर्‍यापैकी वापरण्यास सुरवात झाली.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिवरामकृष्णन म्हणाले की, गेल्या वर्षी समाजातील सर्व घटकांमध्ये आत्मनिर्भर हा शब्द ऐकला गेला. अर्थव्यवस्था कोरोनामधून बाहेर काढण्याचा हा एक मार्ग बनला. 2017 मध्ये ‘आधार’, 2018 मध्ये ‘नारी शक्ती’ आणि 2019 मध्ये ‘संविधान’ या शब्दांना त्या – त्या वर्षाचे मुख्य शब्द म्हणून ऑक्सफर्डने मान्यता दिली.