पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी पद्मनाभन्

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

गेली अनेक वर्षे नुसत्याच चर्चा सुरू असलेली पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. कारण आज झालेल्या अतिवरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये आयुक्तालयासाठी आयुक्तांची नियुक्ती केली आहे.

महामार्ग सुरक्षा, वाहतूक विभागाचे आयुक्त आऱ के़ पद्मनाभन यांची नियुक्ती झाली असून पिंपरी-चिंचवडच्या नव्या पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.
[amazon_link asins=’B078LVWLJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’78ec3982-93de-11e8-a1e2-19b48b7e684a’]

पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक, उप महानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. या बदलांमुळे राज्यात मोठे बदल झाले आहेत. गेली दोन महिन्यांपासून वरिष्ठ, अतिवरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. दोन महिन्यापासून आज होतील उद्या होतील असे चालू होते. मात्र कोणत्यातरी कारणामुळे बदल्या काही होत नव्हत्या. अखेर शुक्रवारी (दि.२७) राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. यामध्ये पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक दर्जाच्या,  उप महानिरीक्षक दर्जाच्या आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत.
या बदल्यानंतर लगेचच अतिरीक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. यामध्ये महामार्ग सुरक्षा, वाहतूक विभाग येथे पोलीस आयुक्त असणारे आऱ के़ पद्मनाभन यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी झालेली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त झाले आहेत. त्यांच्या बरोबर सह पोलीस आयुक्त म्हणून मकरंद रानडे, उपायुक्त म्हणून नम्रता पाटील, विनायक ढाकणे हेही असणार आहेत.

नवी मुंबई आयुक्तपदी संजय कुमार

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी पद्मनाभन्

पोलीस आयुक्‍त रश्मी शुक्‍ला यांची बदली

विवेक फणसळकर ठाण्याचे नवे पोलीस आयुक्‍त