पदवीधर निवडणुक : वाचाळवीरांना जबरदस्त चपराक, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे. हा विजय म्हणजेच वाचाळवीरांसाठी चपराक आहे असं भाष्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी केलं. पदवीधर निवडणुकीच्या या निकालानंतर मुख्यमंत्र्यांसह आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. पुढील निवडणुकाही एकत्रित लढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं अजित पवारांनी यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. मित्र आम्हाला सोडून गेला म्हणून ही परिस्थिती ओढवली, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर निवडणुकीतील निकालानंतर केलं.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार स्थिर स्थावर झालेले आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार व्यवस्थित सुरु असल्याचं ही त्यांनी सांगितलं. अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता की बिन कामाचा सल्ला देण्याचं काम काही लोक करत आहेत. पराभव मान्य नाही. त्यावर “त्यांच्या जागी आम्ही असतो तर चिंतन करु अशी प्रतिक्रिया दिली असती” असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

You might also like