कामगारांसाठी पेंटीग कंत्राटदाराने चोरल्या १० दुचाकी, पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हडपसर पोलिसांनी एका पेंटींग कंत्राटदाराला अटक केली असून त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत. कामगारांना दुचाकी लागत असल्याने तो दुचाकी चोरत होता. त्यातील एक दुचाकी चालवत असताना हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली.

दिनेश जीवन देवाल (२९, पिंपरी गाव, मुळ. जि. नागोर राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हडपसर पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी व अधिकारी जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस नाईक प्रताप गायकवाड, पोलीस शिपाई नितीन मुंढे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिनेश देवाल याच्याकडे चोरीची दुचाकी आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो चोरीची दुचाकी चालवत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर हडपसर पोलीस ठाण्यातील ३, समर्थ २ कोंढवा, वानवडी, चंदननगर,  भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी १ असे १० गुन्हे पोलिसांनी उघडकिस आणले. त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यासाठी करत होता वाहने चोरी

दिनेश देवाल हा मुळचा राजस्थानचा असून तो पुण्यात मागील २० वर्षांपासून पेटींगचे काम करतो. तो पेंटींगचा कंत्राटदार आहे. त्याला मागील दोन वर्षांपासून कामगारांसाठी दुचाकींची गरज पडू लागली होती. त्यासाठी त्याने स्वत: दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. तो दुचाकी चोरून त्या लपवून ठेवत होता. त्यातील एक दुचाकी चालवताना पोलिसांनी त्याला अटक केली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आय़ुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, कर्मचारी युसुफ पठाण, राजेश नवले, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, राजू वैगरे, गणेश दळवी, नीतीन मुंढे, अकबर शेख, गोविंदत चिवळे, शशिकांत नाळे यांच्या पथकाने केली.