PAK vs NZ 1st Test | बाबर आझमने रचला इतिहास; युसूफचा 16 वर्षांपूर्वीचा ‘तो’ विक्रम मोडला

पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ 1st Test) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सामना पाकिस्तानमधील कराची या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या (PAK vs NZ 1st Test) सामन्यात 13 धावा करताच, तो एका वर्षात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

बाबर आझमने 2022 मध्ये आतापर्यंत 44 सामन्यांमध्ये 52.67 च्या सरासरीने 2423 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 शतके आणि 17 अर्धशतके यांचा समावेश आहे. याचबरोबर त्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद युसूफचा 16 वर्षांपूर्वीचा रेकॉर्डदेखील मोडला आहे. मोहम्मद युसूफने 2006 मध्ये 33 सामन्यांत 69.57 च्या सरासरीने 2435 धावा केल्या होत्या. यामध्ये 9 शतके आणि 8 अर्धशतके यांचा समावेश होता.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार
संगकाराच्या नावावर आहे. त्याने 2014 मध्ये 2868 धावा केल्या होत्या.
तसेच भारताकडून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
त्याने 2017 मध्ये एका वर्षात 2818 धावा केल्या होत्या.

Web Title :- PAK vs NZ 1st Test | pak vs nz babar azam broke mohammad yousufs record 16 years ago to become the highest test run scorer for pak in a single year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अक्षय कुमारचा अनोखा अंदाज पाहून ट्विंकल खन्नाने केले ट्रोल

Ashish Shelar | ‘काळजात ज्यांच्या ‘मराठीपणाची’ काळजीच उरली नाही, आशिष शेलारांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा