निषेध नोंदवण्यासाठी पाक क्रिकेटरने केले ‘असे’ काही ; ते वाचून तुम्ही थक्क व्हाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्वच संघ यासाठी जोरदार तयारी करत आहेत. विश्वचषक आपणच जिंकणार असा सगळ्याच संघाना आत्मविश्वास आहे. सर्व संघानी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा देखील आहे. मात्र या सगळ्यात  पाकिस्तानच्या संघाने सध्या इंग्लंडमध्ये खेळात असलेल्या आपल्या विश्वचषकाच्या संघात दोन मोठे बदल केले आहेत.

आयसीसीने  आपल्या संघात २३ तारखेपर्यंत बदल करण्याची प्रत्येक संघाला मुभा दिली होती. त्यानुसार पाकिस्तानच्या संघाने  आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर, वहाब रियाझ आणि फलंदाज असिफ अली यांना संधी दिली. त्यांच्या जागी जुनेद खान, फहीम अश्रफ आणि अबिद अली यांना संघाबाहेरचा रास्ता दाखवण्यात आला आहे. पाकिस्तान विश्वचषकात आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  खेळणार आहे.

त्यानंतर संघातून वगळण्यात आलेल्या  वेगवान गोलंदाज  जुनेद खान याने अनोख्या प्रकारे निषेध नोंदवला आहे. त्याने तोंडावर काळी पट्टी बांधलेला फोटो ट्विट केला आणि “अंतिम संघातून मला वगळण्याच्या निर्णयावर मला काहीही बोलायचे नाही. सत्य हे नेहमी कटू असते”, असे ट्विट करत त्याने निषेध व्यक्त केला. पाकिस्तान सध्या इंग्लंडमध्ये असून त्यांच्याविरुद्ध  एकदिवसीय मालिका खेळात आहे. मात्र या मालिकेत पाकिस्तानला इंग्लंडकडून ४-० असा दणदणीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अखेर पाकिस्तान निवड समितीला जाग आली आणि  त्यांनी पाकिस्तानच्या संघात बदल केले आहेत.

दरम्यान,या सगळ्यात धक्कादायक समावेश हा वहाब रियाझ याचा आहे. कारण त्याने  २०१७ नंतर  एकही  सामना खेळलेला नाही, तरीही  त्याचा समावेश संघात करण्यात आलेला आहे. आता त्याच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.