कंगाल ‘पाक’चा नवीन फंडा, विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘बेली डान्स’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात सगळ्याच राष्ट्रांसमोर हात पसरणाऱ्या कंगाल पाकिस्तानमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तान विदेशी गुंतवणूकधारकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कंगाल असून विविध देशांकडे मदत मागत आहे. सध्या पाकिस्तानची हालत मोठ्या प्रमाणावर खस्ता असून विदेशी गुंतवणूकदारांना ते आमंत्रण देत आहेत.

अजरबैजानमध्ये  पाकिस्तानचा एक व्हिडीओ समोर आला असून या ठिकाणी पाकिस्तानने विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या कार्यक्रमात बेली डान्सचा सहारा घेतला आहे. पाकिस्तानच्या सीमा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने अजरबैजानची राजधानी बाकूमध्ये गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी या बेली डान्सरच्या साहाय्याने गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला. या संस्थेने  पाकिस्तानमधील खैबर पख्तूनखवामध्ये विदेशी  गुंतवणूक वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र या कार्यक्रमात होत असलेल्या या कृत्याने सगळेच जण हैराण झाले.

दरम्यान, या डान्सचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे पाकिस्तानच्या सरकारवर जगभरातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्याचबरोबर भारताला हल्ल्याची धमकी देणारा पाकिस्तान अशा प्रकारे पैसे मागत असून  त्यांची जगभरातून थट्टा उडवण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त