विमानात ‘त्या’ महिलेने टॉयलेट समजून उघडली ‘Emergency Exit’ची खिडकी, पुढे झाले ‘असे’ काही की वाचून व्हाल थक्‍क

इस्लामाबाद : वृत्त संस्था – जर्मनीतल्या मँचेस्टर विमानळावर शनिवारी एका महिलेकडून नजरचुकीने एक अनोखी घटना घडली ज्यामुळे सगलीकडे तारंबळ उडाली आणि काही काळ गोंधळाचे वातावरण पसरले. पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाइन्स (PIA) या पाकिस्तानी विमान वाहतूक कंपनीच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिलेने चुकून टॉयलेटच्या दरवाज्याऐवजी आपत्तीकाळासाठी असणाऱ्या दरवाज्याचे बटन दाबले ज्यामुळे ते दार उघडले आणि खाली उतरण्यासाठी शिडीही बाहेर आली.

या अनपेक्षित आणि अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे व्यवस्थापनासहित सगळेच गोंधळून गेले. त्यामुळे उड्डाणाच्या तयारीत असणाऱ्या या विमानाचे उड्डाण तातडीने रद्द करण्यात आले आणि विमान बाजूला लावण्यात आलं. नंतर चौकशी केली असता त्या महिलेने टॉयलेटला गेले असता नेमका कोणता दरवाजा टॉयलेटचा आहे आणि कोणते बटन दाबायचे या गोंधळातून चुकून Emegency Exit चे बटन दाबले गेल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व प्रकार स्पष्ट झाला.अनवधानाने झालेल्या छोट्याश्या चुकीतून मोठा अनर्थ यावेळी थोडक्यात टळला.

मात्र या सर्व प्रकारामुळे विमानाच्या उड्डाणाला आणि पर्यायाने प्रवाशांना तब्ब्ल सात तासांचा उशीर झाला. तेवढा वेळ प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था देखील या उड्डाण कंपनी ला करावी लागली. दरम्यान पाकिस्तानची हि पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाइन्स (PIA) सध्या प्रचंड आर्थिक तोट्यात असून अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरी जात आहे. दरम्यान घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल PIAचे मुख्य कार्यकारी अधिकारी एयर मार्शल अरशद मलिक यांनी घेतली असून सखोल चौकशी करण्याचे आदेश कंपनी प्रशासनाला दिले आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

पपईच्या रस प्यायल्याने होतात ‘हे’ ७ फायदे

गरोदरपणातील काही अविश्वसनीय गोष्टी, ज्या सत्य आहेत

लसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे

शुक्राणू वाढविण्यासाठी ‘ही’ आसने आहेत लाभदायक