लोणावळ्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; देशद्रोहाचा गुन्हा दाखल

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू-काश्मिर मधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवांनाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्यात ४४ जवान शहीद झाले. यावर देशात रोष व्यक्त होतं आहे. त्यात ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा एकल्या तर नवल वाटणार नाही. परंतू त्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा कानावर पडल्या तर समाजात वादात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

देशात सर्वत्र संतापाची लाट उसळलेली असताना लोणावळ्यातील शिवाजी चौकात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणा दिल्याचे चित्र समोर आले. हा व्यक्ती रेल्वेच्या टिकिट कलेक्टर म्हणजे टीसी आहे. उपेंद्रकुमार श्रीवीर बहादुरसिंग असं या टीसीचे नाव आहे. याचे वय ३९ असून तो मुळचा पटणा, बिहारचा रहिवासी आहे. तो लोणावळा स्थानकावरच कामाला आहे.

सुरक्षा जवानांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात निषेध सभा होत होती. त्यावेळी हा प्रकार घडल्याने उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने ताताडीने बाहदुरसिंगचे निलंबन केले आहे.

दरम्यान, बहादुरसिंगवर कलम १५३ बी नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी दिली आहे. तर तेथील जनसमुदायाला शांत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.