पाकिस्तान : सिंधी हिंदू विद्यार्थिनी नम्रता चंदानीच्या हत्ये विरोधात लोक काराचीच्या रस्त्यावर

कराची : वृत्तसंस्था – येथील एका सिंधी तरुणींवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सिंधी हिंदू नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. सिंध प्रातांतील लारकाना येथे ही घटना घडली होती.

नम्रता चंदानी हिचा गळा आवळून तिची हत्या केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. नम्रता चंदानी ही घोटकी येथील रहिवासी होती. ती लारकाना येथील बीबी आसिफा डेंटल महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थीनी होती. तिच्या वसतीगृहातील तिचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या गळ्याला दोरी बांधलेली होती. पोलिसांचे म्हणण्यानुसार मुलीने आत्महत्या केली. परंतु, कुटुंबाचा दावा आहे की, तिच्यावर अत्याचार करुन तिचा खुन करण्यात आला.

या घटनेने पाकिस्तानमधील हिंदु नागरिक असुरक्षित असल्याचे दिसून आले असून त्यांच्यात संतापाची लाट पसरली आहे. पोलीस हे प्रकरण दडपून टाकत असल्याचे दिसून येत असल्याने कराची शहरातील सिंधी लोकांमध्ये खदखद होती. त्यातून मंगळवारी ते सर्व जण एकत्र आले व या हत्येच्या विरोधात त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.

You might also like