Watch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी एकमेकांना केली जोरदार शिवीगाळ, हाणामारीपर्यंत पाळी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या (Pakistan) संसदेत खासदारांनी (MP) शिवीगाळ, हाणामारी करून देशाची प्रतिष्ठा पायदळी तुडवली. पाकिस्तानी खासदारांना एक क्षणभर सुद्धा भान राहिले नाही की, ते देशाचे खासदार आहे आणि जनतेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या खासदारांनी संसदेच्या आत एकमेकांना जोरदार शिवीगाळ केली. अपशब्द वापरले…आणि स्थिती हाणामारीपर्यंत पोहचली.

संसदेची लज्जास्पद स्थिती
पाकिस्तानी संसदेचे खालचे सभागृह, ज्यास नॅशनल असेंब्ली म्हटले जाते, तेथील दृश्य तुम्ही छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये पाहू शकता. जिथे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांच्या प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवल्या आणि एकमेकांना अश्लील शिवीगाळ केली. पाकिस्तानी मीडियानुसार, संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी एकमेकांवर फाईल्स फेकून मारल्या.

यावेळी खासदारांनी एकमेकांना मारण्याचा प्रयत्नही केला. जेव्हा पाकिस्तानी खासदार एकमेकांना आई-बहिणीवरून शिव्या देत होते, त्यावेळी संसदेच्या आत अनेक महिला खासदार सुद्धा उपस्थिती होत्या, परंतु यामुळे पाकिस्तानी खासदारांना कोणताही फरक पडला नाही. ते भर संसदेत एकमेकांना शिवीगाळ करत होते. जेव्हा स्थिती बिघडली तेव्हा सुरक्षा दलांना नॅशनल असेंब्लीमध्ये बोलवावे लागले.

बजेटवर सुरू होते भाषण

पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनच्या वृत्तानुसार, या संपूर्ण वादाचे कारण होते बजेट. रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Former Prime Minister Nawaz Sharif) यांचे छोटे भाऊ शहबाज शरीफ (Shahbaz Sharif) सभागृहाला संबोधित करत होते. शहबाज शरीफ हे इम्रान सरकारने (Imran Sarkar) सादर केलेल्या बजेटबाबत (Budget) देशातील जनतेसमोर आपले मत मांडत होते. परंतु, या दरम्यान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे खासदार अली अवान (MP Ali Awan) यांनी विरोधी पक्षाच्या एका खासदारावर ओरडण्यास सुरूवात केली. आणि त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

शिवीगाळ करत खासदार अली अवान (MP Ali Awan) यांनी एक पुस्तक सुद्धा विरोधकांकडे भिरकावले. बस, यानंतर तमाशा सुरू झाला…क्षणात पाकिस्तानी संसद युद्धभूमी बनली आणि खासदार एकमेकांवर तुटून पडले. सोशल मीडियावर पाकिस्तानी संसदेतील अनेक व्हिडिओ सतत वायरल होत आहेत.

इम्रान खान यांच्यावर बरसल्या मरियन औरंगजेब
पीएमएल-एन च्या खासदार मरियम औरंगजेब (MP Maryam Aurangzeb) यांनी इम्रान खान यांच्यावर देशाच्या संसदीय व्यवस्थेला अपंग बनवल्याचा आरोप केला.
त्यांनी म्हटले इम्रान खान यांचा नवीन पाकिस्तान हाच आहे.
जिथे फॅसिस्ट शक्ती आहे आणि इम्रान खान (Imran Khan) यांच्यात फॅसिस्ट मानसिकता आहे.
त्यांनी पाकिस्तानी लोकशाहीची (Pakistani democracy) कंबर मोडली.
पाकिस्तानच्या संसदेत सुरू असलेल्या या गोंधळाचे लाइव्ह टेलिकास्ट सुद्धा सुरू होते.
संपूर्ण देशाने खासदारांना जनावरांप्रमाणे आपसात लढताना पाहिले.

Wab Title : pakistan national assembly turn battleground chaos lawmakers fistfight imran khan

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये