पाकिस्तानात पुन्हा लष्करी राजवट ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता उलथवून टाकली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ माजला असून याचा फटका इम्रान खान याच्या सरकारला बसण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तानला लष्करी राजवट नवीन नाही. मात्र यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या इम्रान खान साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पाकिस्तानच्या लष्कराचा अनेक विषयांमधील हस्तक्षेप वाढल्याने पाकिस्तानमध्ये हि भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या ७२ वर्षांच्या इतिहासात त्या ठिकाणी आतापर्यंत ३५ वर्ष लष्कराने राज्य केले आहे. त्यामुळे यावेळी देखील हि भीती व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान इम्रान खान ज्याठिकाणी भेट देण्यासाठी जातात त्याठिकाणी लष्करप्रमुख बाजवा हे उपस्थित असतात. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात त्यांचा हस्तक्षेप वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा २० वर्षानंतर पाकिस्तानमध्ये लष्कराची सत्ता येण्याची भीती निर्माण झाली.

दरम्यान, काश्मीरच्या मुद्द्यावर इम्रान खान सरकार आणि पाकिस्तानी लष्करामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता इम्रान खान या सर्व गोष्टींना कशा प्रकारे हाताळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे.

आरोग्यविषयक वृत्त –