ये बात ! पाकिस्तानात तब्बल ७२ वर्षानंतर हिंदू मंदिर उघडलं, भारतातून नेली जाणार मुर्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सियालकोट मध्ये ७२ वर्षानंतर एक हिंदू मंदिर उघडले गेले आहे. सियालकोटमधील शावाला तेजा सिंह या मंदिराला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच उघडले गेले आहे. आता या मंदिरात भारतीय देवी देवतांच्या मुर्त्या स्थापित करण्यात येणार आहेत. भक्तांनी ७२ वर्षानंतर पुन्हा हे मंदिर उघडले असून हिंदू रिती-रिवाजानुसार या मंदिराच्या पूजेचे आयोजन केले होते. त्यानंतर हिंदू परंपरेनुसार पूजा करण्यात आली तसेच हर-हर महादेव च्या घोषणा देण्यात आल्या. या मंदिराला पुन्हा उघडण्यासाठी पाकिस्तान इवैक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाने मागणी केली होती. त्यानुसार हिंदू सुधार सभेचे अध्यक्ष अमरनाथ रंधावा, डॉ. मुनावर चंद आणि पंडित काशी राम तसेच अन्य हिंदू नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या बोर्डाचे सचिव सय्यद फराज अब्बास यांनी सांगितले कि, हिंदू धर्मियांकडून गेल्या क्रित्येक वर्षांपासून हे मंदिर उघडण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर इवैक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी आदेश दिल्यानंतर हे मंदिर पुन्हा उघडण्यात आले. या मंदिराच्या उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज घेऊन या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले जाणार आहे. हिंदू सुधार सभेचे अध्यक्ष अमरनाथ रंधावा यांनी या निर्णयाबाबत पाकिस्तान सरकारचे आभार मानले आहेत. तसेच या निर्णयाबद्दल कौतुक देखील केले आहे. मात्र त्याचबरोबर हिंदूंना या मंदिरात दररोज जाण्यास मिळावे जेणेकरून ते या मंदिरात पूजा-पाठ करू शकतील. त्याचबरोबर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंदिरात बसवण्यासाठी मुर्त्या भारतातून आणण्यात येणार आहेत.

दरम्यान, याआधी पाकिस्तान- करतारपुर कॉरिडॉर देखील बनवण्यास सुरुवात झाली आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या ५५० व्या प्रकाश पर्व म्हणजेच जयंतीच्या मुहूर्तावर या कॉरिडॉरला उघडले जाणार आहे. याआधी देखील पाकिस्तानातील लाहोरमध्ये महाराजा रणजीत सिंह यांचा पुतळा उभारण्यात आला होता. महाराजा रणजीत सिंह यांच्या १८० व्या जयंतीनिम्मित हा पुतळा उभारण्यात आला होता.

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय