पाकिस्तनाकडून 2 बेटे चीनला आंदण म्हणून मिळणार ?

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार ( Imran Khan Government) सिंधमधील ( Sindh) नागरिक अथवा सरकारच्या परनानगीशिवाय चीन सरकारच्या ( China Government) मागणीवर सिंधशी संबंधित बौद्ध आणि बुंधल बेट चीनला आंदण देण्याची तयारी करत आहे.

अर्थात यामागे चीनचा मोठा कट आहे. पाकिस्तानच्या मदतीने चीन अरबी समुद्रात वि्स्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडुन मागील वर्षी चीन दौऱ्यात सिंध आणि बलुचिस्तानचा ( Baluchistan) किनारी भाग आणि बेटे विकसित करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली होती.

यामध्ये चीनकडून पाय पसरण्याच्या उद्देशाने आठ बेटांच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. चीनकडून या बेटांवर ताबा मिळवण्यासाठी मोठ्या चातुर्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या बेटांवरील बहुतांश कामे चिनी इंजिनीअरकडून करण्यात येत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like