पाकसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर ; पाकिस्तानी रुपयात ऐतिहासिक घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानच्या रुपयाचं मूल्य १४१ वर पोहचलं आहे. अजून काही दिवसात रुपयाची स्थिती अजूनच बिकट होईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. परिणामी, पाकिस्तानच्या नागरिकांना महागाईची झळ बसू शकते.

पाकिस्तानला खनिजतेलासाठी बाहेरील देशांवर अवलंबून रहावे लागते. खनिजतेल आयात करण्याच्या व्यापारात या घसरत्या रुपयाचा परिणाम दिसून येतोय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बेआऊट डील केल्यावर पाकिस्तानच्या रुपयात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एका डॉलरच्या तुलनेने पाकिस्तानी रुपया तब्बल १४१ पर्यंत घसरला आहे.

रुपयात झालेल्या या घसरणीचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे. अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरवात केली आहे. महागाई वाढीबरोबरच वीज,पाणी, गॅस यांसारख्या मूलभूत सुविधा देखील यांमुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे.

You might also like