‘कंगाल’ पाकिस्तानात महागाईचा ‘भडका’, दूध 180 रुपये लीटर तर मटन 1100 रुपये किलो

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पाकिस्तानातील जनता महागाईने बेहाल झाली आहे. पाकिस्तानात सामान्य माणसाला रोज लागणार दूध 180 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर सफरचंद 400 रुपये किलो, संत्री 360 रुपये किलो आणि केळे 150 रुपये किलो एवढे महाग झाले आहेत. पाकिस्तानात मटन 1100 रुपये किलो झाले आहे. रोजच्या जीवनात लागणाऱ्या या गरजेच्या वस्तू महाग झाल्याने पाकिस्तानमधील सामान्य माणूस हैराण झाला आहे.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा व्याजदर 12.25 टक्के –

पाकिस्तानात सामान्य माणसाला होत असलेल्या त्रासाचे कारण आहे तेथील अर्थव्यवस्था. पाकिस्तानमधील अर्थव्यवस्था डबघाईला आली असून, तेथे महागाईने उचांक गाठला आहे. महागाई वाढल्याने लोकांचे खरेदी करण्याची क्षमता कमी झाली आहे. तर स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने चेतावनी दिली आहे की, जर महागाईवर लगाम राहिला नाही. तर देश आर्थिकदृष्ट्या डबघाईला येईल. बँकेचे व्याज दर देखील वाढले असून स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने आपल्या व्याज दरात वाढ करुन तो 12.25 टक्के केला आहे. पाकिस्तानच्या सेंट्रल बँकला विश्वास आहे की व्याजदर वाढल्यास महागाईवर नियंत्रण मिळू शकते.

पाकिस्तानी रुपया जगातील सर्वात तळाला गेलेले चलन –

पाकिस्तानी रुपया मागील काही दिवसापासून बराच तळाला गेला आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया गुरूवारी 150.50 रुपये इतका ताळला गेला होता. मे महिन्यात पाकिस्तानी रुपया जगातील सर्वात तळाला गेलेले चलन होते. याच कारणाने पाकिस्तानात कांद्याचे दर 77.52 टक्क्यांनी वाढले आहेत तर साखर, लिंबू, टॉमेटो, टरबूज या सर्वाचे भाव गगनाला भिडले आहे. पाकिस्तानमधील लोकांचे जगणे महागाईमुळे बेहाल झाले आहे.

सिने जगत –

…म्हणून हॉलीवूड सिंगर सेलेना गोमेज सोशल मिडियापासून राहते ‘दूर’

‘रॅपर’ हनी सिंगचे ‘हे’ गाणे धुमाकूळ घालणार

ब्रेकअपनंतर अशी झाली होती शाहिद कपूरची ‘हालत’

महिला अँकरच्या ‘त्या’ प्रश्‍नावर सचिन तेंडूलकरने मारला ‘सिक्सर’