याला म्हणतात नवाबी शौक ! एका जोडप्याने सिंहाच्या बछड्यासह केले लग्नाचे फोटोशूट, Video व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन : असे म्हणतात की, ‘शौक बड़ी चीज है.’ मग ती खाण्याची असो, प्रवासाची असो किंवा इतर कुठल्याही कामाची आवड असो. बरेच वेळा लोक आपला छंंद पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जातात. असेच एक प्रकरण पाकिस्तानमधून समोर आले आहे, जिथे आपला छंद पूर्ण करण्यासाठी कपलने सिंहाच्या बाळासह त्यांचे वेडिंग फोटोशूट केले आहे. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचवेळी फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर या जोडप्याचा त्रासही वाढला आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची ही घटना आहे. एका नवविवाहित जोडप्याने सिंहाच्या बछड्यासह फोटोशूट केले आहे. हेे फोटो इंस्टाग्रामवर ‘sardarqasimkhanbhurgrii’ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहेत. ही छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केले जात आहेत. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर वापरकर्ते जोडप्यावर जोरदार टीका करीत आहेत. एवढेच नाही तर या दाम्पत्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. कारण, वन्य प्राण्यांचा व्यावसायिक कामासाठी वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे लोक कारवाईची मागणी करत आहेत.

त्याच वेळी, वाइल्ड लाइफ ने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच या जोडप्यावर आणि फोटोग्राफर विरूद्धही कारवाई केली जात आहे.