Palkhi Sohala 2023 | आषाढी पालखी सोहळा आणि G 20 परिषदेनिमित्त पुणे पोलिसांची व्यापक तयारी ! 12 ते 15 जून दरम्यान शहरातील वाहतूक मार्गात बदल; 7 ते 8 लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Palkhi Sohala 2023 | आषाढी पालखी सोहळा (Pandharpur Ashadhi Wari 2023) आणि जी २० परिषदेच्या दृष्टीने शहरातील वाहतूक (Pune Traffic Police) सुरळित राखण्यासोबतच सुरक्षिततेसाठी शहर पोलिसांनी (Pune City Police) जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळ्यामध्ये सात ते आठ लाख वारकरी (Warkari’s In Pune) सहभागी होतील, अशी शक्यता आहे. त्यानुसार सात हजार पोलिस, होमगार्ड (Home Guard Pune) आणि एसआरपीएफच्या तुकड्या (SRPF Pune) बंदोबस्तासाठी तैनात (Police Bandobast For Palkhi Sohala) करण्यात येणार असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. (Palkhi Sohala 2023)

 

 

याप्रसंगी सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर (DCP Vijaykumar Magar), गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) उपस्थित होते. आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले, की सोमवारी १२ जून रोजी संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023) आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्या (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) पुण्यात येत असून १५ जूनला शहर हद्दीतून पुढे मार्गक्रमण करणार आहेत. याच सुमारास जी २० परिषदेनिमित्त (G 20 Summit Pune) जगभरातील ३७ देशांचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. पालखी आगमनावेळी शहरातील वाहतूकीमध्ये तसेच शहरात येणार्‍या महामार्गावरील वाहतुकीतही नेहमीप्रमाणे बदल केले जाणार असून वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले जाणार आहेत. (Palkhi Sohala 2023)

 

पालख्यांचे लोकेशन समाजावे, यासाठी जीपीएस यंत्रणा असलेल्या प्रत्येकी चार मोटार सायकल पालख्यांच्या मागे पुढे ठेवण्यात येणार आहेत. यासोबतच ड्रोनद्वारे देखिल गर्दीवर लक्ष ठेवून नियंत्रण केले जाणार आहे. मोबाईल नेटवर्क जॅम होण्याची शक्यता लक्षात घेउन संपर्कासाठी वॉकीटॉकी संच मोठ्याप्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून पावसाची शक्यता दिसत नसल्याने वारकर्‍यांना उन्हाचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभुमीवर महापालिका Pune Municipal Corporation (PMC) आणि जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधेचे नियोजन केले आहे.

 

परदेशी पाहुण्यांना पालखी दर्शनासाठी फर्ग्युसन कॉलेज (FC Road Pune) येथे खास व्यवस्था

जी २० निमित्त येणार्‍या परदेशी पाहुण्यांना पालखी सोहळा दाखविण्यात येणार आहे. यासाठी फर्ग्युसन कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव अन्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. आज या जागेची संयुक्त पाहाणी करण्यात आल्याची माहिती आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

 

चोरट्यांवर नजर

वारीमध्ये चेन स्नॅचर आणि पाकीटमारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Police) आणि ग्रामीण पोलिसांची (Pune Rural Police) संयुक्त पथके तयार करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सचित्र यादीच तयार करण्यात आली असून सर्व पोलिसांना पाठविण्यात आली आहे. तसेच साध्या वेषातील पुरूष आणि महिला कर्मचारी देखिल वारीमध्ये असतील. वारी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.

 

मेट्रोचे काम सात दिवस बंद

पालखी मार्गावर पुणे मुंबई रस्ता (Pune Mumbai Road), गणेशखिंड रस्ता (Ganeshkhind Road)
परिसरात मेट्रोचे (Pune Metro) काम सुरू असून शहराच्या अन्य भागातही काम वेगाने सुरू आहे. पालखी सोहळ्या
दरम्यान मेट्रोची बहुतांश कामे बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रामुख्याने या कामासाठी सुरू असलेली
अवजड वाहतूक सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

 

पालखी सोहळा आणि वाहतूक बदलाचे अपडेट diversion.punepolice.gov.in वर

सोहळ्या निमित्त शहरातील वाहतूक मार्गात मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येतो (Pune Traffic Updates). पालखी
आगमनापासून पालखी महापालिका हद्दीबाहेर जाईपर्यंत चार दिवस हे बदल असतात. पालखी मार्गावर पालखीच्या
आगमनाअगोदर पुढील रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. पालखी पुढे गेल्यानंतर गर्दीचा अंदाज घेउन मागील रस्त्यावरील
वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. पालखी मार्गाची माहिती नागरिकांसह वाहन चालकांना मिळावी तसेच पालख्यां कुठे आहेत
याचे अपडेटस मिळावेत यासाठी पुणे पोलिसांनी diversion.punepolice.gov.in हे वेबपेज तयार केले आहे.
या वेबपेजवर एक क्लिकवर माहिती मिळणार आहे. नागरिक व वाहनचालकांनी वेळेचा अपव्यय
टाळण्यासाठी या वेबपेजचा वापर करावा, असे आवाहन सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केेले आहे.

 

Web Title :  Palkhi Sohala 2023 | Extensive preparation of Pune Police on the occasion of Ashadhi Palkhi ceremony and
G 20 conference! Changes in traffic routes in the city between June 12 and 15; 7 to 8 lakh workers are likely to participate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा