Pune Police On Sharad Pawar Death Threat | जीवे मारण्याच्या धमकीच्या पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांकडून शरद पवारांच्या दौर्‍याच्यावेळी बंदोबस्तात वाढ

नितीन पाटील

 

पुणे – Pune Police On Sharad Pawar Death Threat | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना सोशन मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून पुणे शहर पोलिसांनी (Pune City Police) शरद पवार यांच्या दौर्‍याच्या वेळी पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. याबाबतची माहिती शहर पोलिस दलातील अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने ‘पोलीसानामा ऑनलाइन’ला दिली आहे. (Pune Police On Sharad Pawar Death Threat)

 

शरद पवार यांना ट्विटरवरून आलेल्या धमकीप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आणि इतर नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) त्याबाबत तक्रार केली आहे. त्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत असले तरी शरद पवार यांच्या पुणे शहर दौर्‍याच्या वेळी त्यांच्या पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण राज्य सरकारनं गंभीर्यानं घेतलं आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे स्वतः बोलले आहेत.
शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्णकाळजी घेतली जाईल,
आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत
असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. आता पुणे शहर पोलिसांकडून शरद पवारांच्या
दौर्‍याच्या वेळी त्यांच्या पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

 

Web Title :  Pune Police On Sharad Pawar Death Threat | Pune police beef up security during Sharad Pawar’s visit amid death threats

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा