Pune Crime News | परगावाहून पुण्यातील शिवाजीनगर परिसरात आलेल्या लुटणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | परगावाहून आलेल्यांना शिवाजीनगर परिसरातील शिवाजी पुतळा चौकात मारहाण करून लुटणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट- 1 ने अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

संदीप सुनिल ठाकुर Sandeep Sunil Thakur (21, रा. वाल्मीकीनगर, साईबाबा मंदिराजवळ, रामटेकडी, हडपसर) आणि हुसेन बाबुमियाँ शेख Hussain Babumiyan Shaikh (20, रा. व्हिडीओ सेंटर गल्ली, बाबाजान चौक, लष्कर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की दि, 13 एप्रिल 2023 रोजी अभिजीत गाडेकर (रा. सिंहगड रोड) हे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथून पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरात उतरले होते. (Pune Crime News)

 

चौघांनी त्यांना गाठुन मारहाण करून त्यांच्याकडील बॅग आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला होता. त्याबाबत शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल आहेत. सदरील गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेतील युनिट-1 चे पथक तपास करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार दत्ता सोनावणे यांना दोघेजण मोबाईल विक्रीसाठी लष्कर पोलिस स्टेशनच्या (Lashkar Police Station) हद्दीतील शिवाजी मार्केट (Shivaji Market Pune) परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद (Sr PI Shabbir Sayyad) यांना सांगितल्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगितले होते.

पोलिस पथकाने आरोपींना सापळा रचुन अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल आणि इतर ऐवज जप्त केला आहे.
आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो. नि. शब्बीर सय्यद, पोलिस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni),
पोलिस उपनिरीक्षक रमेश तापकिर (PSI Ramesh Tapkir), पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे, राहुल मखरे, इम्रान शेख,
अभिनव लडकत, आय्याज दड्डीकर, निलेश साबळे, शुभम देसाई, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, रूक्साना नदाफ,
तुषार माळवदकर आणि महेश बामगुडे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Pune Police crime branch arrested the robbers who came from Pargaon to Shivajinagar area of ​​Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा