PAN- Aadhaar Link | तुमवे पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक आहे का?, जाणून घ्या हे तपासण्याची सोपी पद्धत

नवी दिल्ली : जर तुम्ही अजून पॅन कार्ड आधारशी लिंक (PAN- Aadhaar Link) केले नसेल, तर तुम्ही १००० दंड भरून ते लिंक करू शकता. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. याआधी जर कोणी आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (PAN- Aadhaar Link) केले नाही तर त्याचे पॅन कार्ड निष्क्रिय मानले जाईल. ३१ मार्चपर्यंत १००० रुपये दंड जमा करून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करता येणार आहे (PAN Link With Aadhaar).

प्राप्तीकर विभागाकडून सुद्धा माहिती देण्यात आली आहे की, ३१ मार्चपूर्वी सर्वांना आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करावे लागेल. जर ते लिंक नसेल तर तुम्हाला पॅन कार्डशी संबंधित सुविधांचा लाभ घेता येणार नाही. तसेच, आयटीआर आणि टीडीएसवर क्लेम करता येणार नाही.

प्राप्तीकर विभागाने पुढे सांगितले की, प्राप्तीकर कायदा, १९६१ अंतर्गत सर्व पॅनकार्ड धारकांसाठी हे अनिवार्य आहे. ज्या पॅन धारकांनी आधार कार्ड लिंक केलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर ते पूर्ण करावे. पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास काय होईल ते जाणून घेऊया.

टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले आहे की जर एखाद्या यूजर्सने ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही
तर त्याचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.
याचा अर्थ तुम्ही पॅन कार्ड वापरू शकणार नाही.
यामुळे पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक (PAN- Aadhaar Link) आहे की नाही हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक झाले आहे की नाही हे माहीत नसेल, तर एका सोप्या पद्धतीने ते तपासू शकता.
यासाठी प्राप्तीकर विभागाच्या Incometax.gov.in या वेबसाईटवर जा. आता Link Aadhaar Status हा पर्याय शोधा.

आधार स्टेटस या लिंकवर क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल.
आता View Link Aadhaar Status वर क्लिक करा.
जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले असेल तर डिस्प्लेवर एक मेसेज दिसेल.
जर लिंक नसेल तर तुम्ही पॅन कार्ड आणि आधारच्या डिटेल्स भरून लिंक करू शकता.

Web Title :- PAN- Aadhaar Link | pan aadhaar link how to check status of pan card and aadhaar card status know process