PAN Card वरील फोटो आणि स्वाक्षरी बदलायची आहे का? ‘या’ पध्दतीनं ऑनलाइन करू शकता हे काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PAN Card एक महत्वाचे कागदपत्र म्हणून वापरले जाते. हा 10 अंकाचा अल्फान्यूमेरिक कोड आहे, जो आर्थिक व्यवहारांची माहिती ठेवतो. याचा वापर ओळखपत्र (PAN Card ) म्हणूनही केला जातो. यासाठी यातील माहिती योग्य असणे गरजेचे आहे (How to change photo or signature on PAN CARD). क्रेडिट कार्ड आणि कर्ज घेताना तुमच्या पॅनकार्डमध्ये (PAN Card ) चूक आढळली तर तुम्ही कर्ज घेऊ शकत नाही. यामुळे त्याच्यातील माहिती अचूक असावी. विशेषता फोटो आणि स्वाक्षरी एकदम योग्य असावे.

 

पॅनकार्डवरील (PAN Card ) फोटो किंवा स्वाक्षरीत काही विसंगती असेल तर अपडेट करण्याचे काम आपल्या घरातून मोबाइल किंवा लॅपटॉपवरून ऑनलाइन करू शकता. हे बदल कसे करावेत जाणून घेवूयात…

 

  • सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • आता अ‍ॅप्लीकेशन टाईप पर्यायावर क्लिक करा आणि पॅन डेटा पर्यायात ‘परिवर्तन किंवा सुधारणा’ पर्यायाची निवड करा.
  • आता मेनू कॅटेगरीत व्यक्तिगत पर्यायाची निवड करा.
  • यानंतर, सर्व आवश्यक माहिती भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
  • आता पॅन अर्जावरच पुढे जा आणि केवायसीचा पर्याय निवडा.
  • यानंतर ‘फोटो मिसमॅच’ आणि ‘सिग्नेचर मिसमॅच’चा पर्याय दिसेल.
  • येथे फोटो बदलण्यासाठी फोटो मिसमॅच ऑपशनवर क्लिक करा आणि स्वाक्षरी बदलण्यासाठी सिग्नेचर मिसमॅच पर्यायाची निवड करा.
  • आता पॅरेंट्सच्या डिटेल्स भरल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर, अर्जदाराला ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि जन्म दाखला लावावा लागेल.
  • यानंतर Declaration वर टिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा.

 

पुढील प्रक्रिया अशी आहे…

 

भारतासाठी फोटो आणि स्वाक्षरी बदलासाठी अर्ज शुल्क 101 रुपये (GST सह) आणि भारता बाहेरील पत्त्यासाठी 1011 रुपये (GST सह)आहे. पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर 15 अंकाची एक पावती क्रमांक मिळेल.यानंतर अर्जाची प्रिंटआऊट इन्कम टॅक्स पॅन सर्व्हिस युनिटला पाठवावी लागेल. जेणेकरून पावती क्रमांकावरून ट्रॅक करता येईल आणि आवश्यक माहिती पाहता येईल. या प्रक्रियेतून तुम्ही तुमच्या पॅन कार्ड मध्ये फोटो आणि हस्ताक्षरात बदल करू शकता.

 

Web Title : PAN Card | want to change the photo and signature on your pan card know how can you do

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti-Corruption Bureau Sangli | 1 लाख 26 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी माळशिरसच्या मुख्याधिकाऱ्यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून FIR

Pune News | आम आदमी पक्षातर्फे पुण्यात ‘भरोसा सेल’ची स्थापना

Sinhagad Road Flyover | सिंहगड रोड अन् कात्रज येथील उड्डाणपुलांबाबत नितीन गडकरींनी केलेली सुचना ‘वास्तवात’ येण्याची शक्यता अगदीच धूसर