पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Pandharpur Crime News | पंढरपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका दहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महात्मा फुले चौकात शौचालयजवळ आज सकाळी एका 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. ज्या शौचालयजवळ हा मृतदेह आढळून आला ते शौचालय अनेक वर्षे बंद होते. मृत मुलाचे नाव कृष्णा तीम्मा धोत्रे असे आहे. धक्कादायक म्हणजे, कृष्णाची छाती पूर्ण फाडलेली, हाताला दुखापत झालेल्या अवस्थेमध्ये हा मृतदेह आढळून आला होता. (Pandharpur Crime News)
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी कृष्णाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. कृष्णाचा छिन्नविछिन्न अवस्थेमधील मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला आहे. तसेच आपल्या मुलाचा खून झाला असल्याचा आरोप कृष्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. पंढरपूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Web Title :- Pandharpur Crime News | dead body of 10 year old boy found near toilet incident in pandharpur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Namrata Malla | नम्रताच्या हॉट फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान
Shah Rukh Khan | पठाणच्या रिलीजआधी शाहरुख खानने चाहत्यांना दिले ‘हे’ सरप्राइज