Pandharpur News | खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श व कर्तृत्ववान मातांचा सन्मान

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pandharpur News | परिस्थितीशी झगडत संसार करीत मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या समाजातील विविध आदर्श मातांना राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीच्या वतीने शारदाई पुरस्काराने सन्मान करण्यात आला. (Pandharpur News)

 

अजितदादा पवार फाउंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रीकांत शिंदे यांच्यावतीने खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान मातांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण व प्रवक्त्या रूपाली ठोंबरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, प्रवक्ते उमेश पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा सचिव प्रियदर्शनी महाडिक, सुनीता रोटे, लता कदम, फुटाणे, पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले, माजी नगरसेवक मोहम्मद उस्ताद, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप मांडवे उपस्थित होते. (Pandharpur News)

 

या कार्यक्रमात संजय आवटे यांच्या मातोश्री रंजना आवटे, जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे व पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांच्या मातोश्री सुवर्णलता रामदास भाजीभाकरे, मारुती गाढवे यांच्या मातोश्री कमल गाढवे, मयुरा शिंदेकर असिस्टंट डायरेक्टर स्मार्ट सिटी यांच्या मातोश्री विद्या क्षीरसागर, उमेश पाटील यांच्या मातोश्री लोकमद्रा पाटील, पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे यांच्या मातोश्री गोपाबाई साबळे, सुजीत कदम यांच्या मातोश्री मीनाक्षी सुभाष कदम, जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर यांच्या मातोश्री सुनंदा खांडेकर, पीएसआय विजय राठोड यांच्या मातोश्री लक्ष्मी राठोड, महाराष्ट्र केसरी चंद्रहार निमगिरे यांच्या आत्या यमुना काळे,

लेखक अनिल राऊत यांच्या मातोश्री पद्मिनी राऊत यांच्यासह वरळी सी लिंक ते गेट ऑफ इंडिया हे समुद्री ३८ कि.मी. अंतर ७ तास २२ मि. पूर्ण करून विश्वविक्रम केल्याबद्दल कीर्ती नंदकिशोर भरडिया, आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळविल्याबद्दल किरण नवगीरे, सिनेट सदस्य प्रा. डॉ. सुशीलकुमार शिंदे, बजरंग शितोळे, डॉ. समाधान माने, डॉ. आर्यन कांबळे, अ‍ॅड. उपा पवार, डॉ. अमर कांबळे व पंढरपूरच्या शीतल गुरव हिची क्रिकेट संघात नेट बॉलर म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे म्हणाल्या, यापूर्वी पक्ष वेगळा होता. मला वर्ष झाले राष्ट्रवादीत प्रवेश करून पण माझ्यामते खासदार शरद पवार, स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. गोपीनाथ मुंडे, राज ठाकरे हे महाराष्ट्राला लाभलेले कोहिनूर हिरे आहेत.

 

सध्या सोशल मीडियामुळे अनेक मुली फसल्या जातात आणि चुकीचा रस्ता निवडतात.
त्यामुळे श्रद्धासारखे प्रकार देशात घडतात.यावर समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांनी
‘मुलांनो आई वडिलांना समजून घ्या’ या विषयावर व्याख्यान दिले.
यावेळी संपूर्ण सभागृहात उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थिनी डोळ्यात पाणी आणून रडत होत्या.

 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी, सूरज पेंडल, सूरज कांबळे,
आकाश सिताफ, विकी अभंगराव, संतोष बंडगर, दादा थिटे, प्रा.मुळे परिश्रम घेत होते.

 

Web Title :- Pandharpur News | On the occasion of Mr. Sharad Pawar’s birthday, honoring exemplary and accomplished mothers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jitendra Awhad | ‘मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच उभा राहतो, म्हणजे पोलीस पाकीटमारीचा गुन्हा दाखल करतील’ – जितेंद्र आव्हाड

Live In Relationship Rules In India | जाणून घ्या लिव्ह इन नात्याबद्दल भारतीय कायदे काय म्हणतात

Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा