Pankaja Munde | पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या; म्हणाल्या – ‘कसल्या फालतू घोषणा देत आहात?’

परळी वैजनाथ : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड (Union Minister Dr. Bhagwat Karad) यांच्या जन आशिर्वाद यात्रेला (Jan Ashirwad Yatra) (सोमवारी) परळीतून सुरुवात झाली आहे. गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांककडून केंद्रीयमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली. ‘पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है, अशा घोषणा मुंडे समर्थकांकडून केंद्रीय मंत्र्यासमोर देण्यात आल्या. कार्यकर्त्यांच्या या घोषणाबाजीमुळे भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) त्यावेळी चांगल्याच भडकल्या. कसल्या फालतू घोषणा देत आहात? आपली संस्कृती अशी नाही, असं म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) कार्यकर्त्यांना झापलं आहे.

भाजपच्या (BJP) वतीने बीडमध्ये जन आर्शिवाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) आयोजित करण्यात आली होती. गोपीनाथ गडावरून याचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून गोपीनाथ गडावर ‘पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा घोषणा दिल्या. यांनतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) चांगल्याच संतापल्या. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ‘ तुम्ही इथे अशा घोषणा देवू नका, हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम नाही. आपल्याच पक्षाचा कार्यक्रम आहे, अशा घोषणांनी बदनामी होते, चुकीच्या घोषणा देणाऱ्यांना मी बोलणार नाही, भेटणार नाही, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे.

Pune Crime | पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

पुढे पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या की, ‘चांगल्या घोषणा द्या, अंगार भंगार या काय घोषणा देतायत? हे संस्कार आहेत का आपले? असं म्हणत संतापलेल्या पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना चांगलंच त्यावेळी झापलं आहे. या दरम्यान, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) यांना डावलून भागवत कराड यांना भाजपने संधी दिली. बहिणीला संधी न मिळाल्यामुळे पंकजा नाराज असल्याचं बोललं जात होतं. दिल्लीवारीनंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली होती. अजूनही प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आज समोर आले.

मात्र, या घोषणाबाजीनंतर चांगल्या घोषणा द्या, अंगार भंगार या काय घोषणा देतायत? हे संस्कार आहेत का आपले? अशा शब्दात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं
आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान खासदार प्रीतम मुंडे, राणा जगजितसिंह पाटील, आमदार नमिता
मुंदडा, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण अण्णा पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, नितीन काळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

CBI Anti Corruption Trap | 2 लाखाची लाच घेताना विभागीय अभियंता आणि 40 हजाराची लाच घेताना कार्यालय अधीक्षक CBI च्या जाळ्यात

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pankaja Munde | beed bjp jan ashirwad yatra bhagwat karad pankaja munde slam party worker

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update