Pankaja Munde | ‘आपलं इमान गहाण ठेऊन ही निवडणूक…’, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला; निवडणुकीचे रणशिंग फुंकले

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती (Parli Vaijnath Krushi Utpanna Bazar Samiti) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या (Election) निमित्ताने आज एन एच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे मतदार व कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी संवाद साधला. लढण्याची ताकद आणि नियत असल्यामुळेच आपण सर्व या निवडणुकीत उतरलो आहोत. प्रत्येकांनी ही निवडणूक स्वतःची आहे असे समजून प्रामाणिकपणाने, कुठल्याही अफवा, अमिषाला बळी न पडता विजयाच्या इर्षेने लढावावी, असं आवाहन पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यावेळी केले.

 

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, देशात पंतप्रधानांपासून ते ग्रामपंचायत निवडणुका लढत असताना पराभवास सामोरे जावे लागते, पण पराभवाने खचून न जाता, हिंम्मत बांधून आपली लोक परत बांधून ठेवणे ही फार मोठी किमया राजकारणात करावी लागते, असं मुंडे यांनी सांगितले.

आम्ही नेतेच जुगाड करतो
या निवडणुका जुगाडावर चालत असतात अन् आम्ही नेतेच याचे जुगाड करतो. आपल्या हातात तर मार्केट कमिटी नाही, मात्र ही निवडणूक आपल्याला स्वाभिमानाने लढायची आहे. आपली भाकरी खाऊन लढायचं आहे, दुसऱ्याची पुरण पोळी खाऊन लढायचं नाही. आपलं इमान गहाण ठेऊन ही निवडणूक लढायची नाही, असा टोला पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) लगावला.

 

म्हणून मी आले आहे…
पाच रुपये तुम्हाला काही जन्मभर पूरत नाहीत. महिला काहीच गडबड करत नाहीत,
मात्र पुरुष गडबड करतात, म्हणून आपल्या ताईला सोडायचे नाही, असं आपलं वचन आहे.
माझी आई ब्रिज कॅण्डी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. पण मी नसण्याने तुम्हाला बर वाटणार नाही,
म्हणून तुम्हाला आधार देण्यासाठी मी आले असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

 

Web Title :- Pankaja Munde | bjp leader pankaja munde started campaigning for parali apmc elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Dsk Vishwa Water Problem – MP Supriya Sule | डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार

MP Udayanraje Bhosale | ‘…तर मी आव्हानांना भीक घालत नाही’, उदयनराजेंचा अजित पवारांना टोला (व्हिडिओ)

RAJIV Gandhi e -Learning School Pune | राजीव गांधी ई-लर्निंग स्कुलला ‘ISO 9001’ मानांकन