Pankaja Munde | पंकजा मुंडेंचे CM ठाकरेंना पत्र, म्हणाल्या – ‘125 वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नका’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून (ता. पाटोदा, जि. बीड ) दरवर्षी पंढरपूरकडे (Pandharpur Wari) जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीला सरकारने परवानगी देऊन वारीचा मार्ग मोकळा करावा. वारीच्या 125 वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नका, अशी मागणी भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. pankaja munde letter to cm uddhav thackery for shrikshetra gahininath gad pandharpur wari

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

 

याबाबत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्र्याना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गहिनीनाथ गड हे वारकरी संप्रदायाचे आद्य उगमस्थान आहे. नवनाथांपैकी एक असलेल्या गहिनीनाथांची संजीवन समाधी याठिकाणी आहे. संत वामनभाऊ महाराज यांनी 125 वर्षापूर्वी या दिंडीची सुरुवात केली होती, ही परंपरा अखंड आजपर्यंत सुरू आहे. सध्या कोरोनामुळे (corona) सरकारने राज्यातील महत्त्वाच्या वारकरी संप्रदायातील संतांच्या 10 पालख्यांना प्रत्येकी 50 भक्तांसह एसटीने परवानगी दिली आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडाच्या दिंडीला परवानगी न मिळाल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे वारीची परंपरा अखंड चालू राहावी यासाठी सरकारने कोरोना नियमांचे पालन आणि शासकीय नियमाप्रमाणे गहिनीनाथ गडाच्या दिंडीला परवानगी द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

Wab Title :- pankaja munde letter to cm uddhav thackery for shrikshetra gahininath gad pandharpur wari

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत