Pankaja Munde । ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडे संतापल्या, म्हणाल्या – ‘…तर सरकारनं निवडणुका रद्द कराव्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्यावर भाजप नेत्या पंकजा (Pankaja Munde) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर ओबीसींचा इम्पिरिकल डाटा (Empirical data) मिळत नसेल तर ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) होणाऱ्या निवडणुका राज्य सरकारने रद्द कराव्यात असं भाजप नेत्या पंकजा मुंडे-पालवे (Pankaja Munde) यांनी म्हटलं आहे. ओबीसी आरक्षणाकडे राज्य सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची टीकाही मुंडे यांनी केली आहे. त्यावेळी पंकजा पुंडे (Pankaja Munde) यांनी प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. (Pankaja Munde said the government should cancel the election)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

पंकजा मुंडे (Pankaja Munde) बोलताना म्हणाल्या की, ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) निवडणुका होणं हे समाजासाठी धक्कादायक आहे. असं त्यांनी मत व्यक्त केलंय. तसेच, या निर्णयाबाबत कोर्टात दाद मागणार असल्याचं देखील त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. सरकार समाजाचा इम्पिरिकल डाटा (Empirical data) नाही म्हणून आरक्षण देणं टाळत आहे. सरकारने हा डाटा मिळवण्यासाठी विशेष कृती दल अर्थात टास्क फोर्सची स्थापना करावी अशी मागणी देखील त्यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलीय. पुढे त्या म्हणाल्या, सध्या घरकुल योजना अथवा सरकारच्या ज्या योजना आहेत त्यातून हा डाटा मिळवावा असं देखील त्या म्हणाल्या. इम्पिरिकल डाटा नाही म्हणून आरक्षण अडलंय हे मात्र मान्य नसल्याचं त्यांनी (Pankaja Munde) सांगितलं आहे.

या दरम्यान, जिल्हा परिषदेतील (ZP) रद्द झालेल्या ओबीसी जागांवरील पोटनिवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केलीय. ह्या सर्व जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत. तर ओबीसींचे आरक्षण परत मिळाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या, यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)आग्रही असतानाच मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने नागपूरसह 5 जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी निवडणुकांची घोषणा केली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

 

Web Titel : pankaja munde on obc reservation election without obc quota is not fair, demand for cancellation charges of elections

हे देखील वाचा

Pimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

‘डोंगर’ पोखरुन ‘उंदीर’ही नाही निघाला; परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा

कोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात अ‍ॅन्टीबॉडी, वैज्ञानिकांनी सांगितलं

या’ 5 मसाल्यांना मिसळून बनवा इम्युनिटी बुस्टर काढा, जाणून घ्या कधी अन् कसा प्यायचा