‘छिचोरे’ चाळे बंद करा : पंकजा मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या राजकारणात हाय होल्टेज ड्रामा म्हणजे मुंडे बंधु-भगिनी यांच्यातला आहे. त्यामुळे दोघांच्या वक्तव्यावर आणि कामांवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. विधानसभेला बराच कालावधी असूनही हे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे हे एकमेकांवर ताशेरे ओढण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतेच परळी पंचायत समितीच्या उद्घाटनप्रसंगी पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेना कोपरखळी मारली आहे. तसंच यावेळी पंकजा मुंडे यांनी राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी आदल्या दिवशी केलेल्या उद्घाटन नाट्याचा समाचार घेतला आहे.

मी सगळा प्रोटोकॉल पाळते. मी कधीच म्हणत नाही याचं नाव का ? आणि त्याचे नाव का ?, असं म्हणत पंकजा मुंडेंनी भाषणाला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत एकही जिल्हा नियोजनची बैठक विरोधीपक्ष नेत्यांनी केली नाही. ते राज्यभर भाषण करत फिरतात. त्यांनी जिल्ह्यातल्या कुठल्या प्रश्नाला न्याय दिला ? मी या इमारतीला निधी दिला, आमदार म्हणून मागणी माझी होती. पण काल काही टोळक्याने उद्घाटन केलं, हे असे छिचोरं वागणं बर नव्हं. हे राजकारणात चुकीचे आहे, असं म्हणत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली.

तसंच जयंत पाटील ग्रामविकास मंत्री होते तेव्हा का निधी आणला नाही, म्हणे प्रयत्न केले. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी टोमणाही मारला. माझ्या मंत्रालयात एक कागदाचे शिफारस पत्र नाही. मग असं वागणं हे राजकरणात खाली मान घालायला लावणारे आहे. उद्घाटन केल्याने कोणी लहान आणि मोठं होतं नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं. उद्घाटन नाट्याची अशा गोष्टीची तीव्र निंदा करते, असंही त्या यावेळी म्हटल्या.

तसं सांगताना पंकजा मुंडे यांनी विरोधकांना जणू दमच भरला आहे. येणाऱ्या काळात परत मीच पाच वर्षांसाठी मंत्री म्हणून निवडून येणार आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरीपण ते कधीच यशस्वी होणार नाहीत. तर त्यांना आयुष्यभर अशाच पद्धतीने रात्रीलाच गुपचूप उद्घाटन करत राहावे लागणार, असंही त्यांनी यावेळी नमुद केले. मी त्यांना कधीही वरचढच राहणार आहे, असंही त्या म्हटल्या.

आरोग्यविषयक वृत्त –

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही