परमबीर सिंग 5 मेपासून दिर्घकालीन रजेवर, तर्कवितर्कांना उधाण

पोलीसनामा ऑनलाइन – param bir singh|राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप करून चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह (Parambir Singh) दीर्घकालीन रजेवर ( long-term leave) गेले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

आजापणामुळे परमबीर सिंह 5 मेपासून रजेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांनी एवढी दीर्घ रजा घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एकीकडे अनिल देशमुख प्रकरणाची न्यायालयात सुनावणी आणि दुसरीकडे एनआयएने सुरू केलेले अटकसत्र यामुळे ते दीर्घ रजेवर गेल्याचे बोलले जात आहे. मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर नाराज परमबीर सिंह काही दिवस सुट्टीवर गेले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोठ्या रजेवर गेले आहेत.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) च्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटक, मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणांत मुंबई पोलिस दला (Mumbai Police) तील अधिकाऱ्यांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती. यानंतर परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख (Home Minister Deshmukh) यांच्यावर खंडणी (Ransom) वसुलीचा आरोप केला होता. यामुळे देशमुखांना राजीनामा (Resigned) देऊन घरी जावे लागले होते. परमबीर सध्या चंडीगडमध्ये असून तेथील डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांनी सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.

अँटिलिया स्फोटकं (Antilia Explosive) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या तपासाला पुन्हा वेग आला आहे. त्यातच परमबीर यांच्यावर खंडणीचे अनेक आरोप असून, त्याचा तपास विविध यंत्रणांना देण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या प्रकरणाचा गोपनीय तपासही अंतिम टप्प्यात आहे.
त्यामुळे परमबीर नेमके कोणत्या कारणांमुळे रजेवर गेलेत याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान परमबीर सिंह रजेवर गेल्याने गृहरक्षक दलाची अतिरिक्त जबाबदारी आयपीएस अधिकारी के. व्यंकटेशन यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : param bir singh has been on leave for close to two months

हे देखील वाचा

Amrita Fadnavis | लसीकरणाची आकडेवारी देत अमृता फडणवीसांचे ट्विट, म्हणाल्या – ‘हो, मी भक्त अन् त्याचा मला अभिमान’

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी वाचविले ‘प्राण’; पण त्याने खिडकीतून उडी घेऊन केली ‘आत्महत्या’

अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा